Tomato Price Hike Esakal
देश

Tomato Price Hike: स्मार्टफोन घ्या अन् २ किलो टोमॅटो मोफत मिळवा; मोबाईल दुकानदाराची गजब ऑफर

मोबाईल शोरूम स्मार्टफोन खरेदीवर 2 किलो टोमॅटो मोफत देण्याची नवीन ऑफर

अंकिता खाणे (Ankita Khane)

देशातील अनेक भागात टोमॅटोचे भाव १०० रुपये किलोच्या पुढे गेले आहेत. घाऊक मंडईतही त्याचे भाव ६० ते ८० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. महाराष्ट्र, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश आदी राज्यांमध्ये प्रचंड वाढले आहेत. दरम्यान मध्य प्रदेशात टोमॅटो महाग झाल्यानंतर शहरातील मोबाईल शोरूम ऑपरेटरने ग्राहकांसाठी एक अनोखी ऑफर दिली आहे. या ऑफरची चर्चा सर्वत्र रंगली आहे. (Latest Marathi News)

मध्य प्रदेशात टोमॅटोच्या किमती वाढल्यानंतर आता शहरातील मोबाईल शोरूम ऑपरेटरने ग्राहकांसाठी अनोखी ऑफर दिली आहे. मोबाईल शोरूम ऑपरेटरने स्मार्टफोन खरेदीवर 2 किलो टोमॅटो मोफत देण्याची ऑफर आणली आहे. शहरात टोमॅटोचे भाव 160 रुपयांच्या पुढे गेले आहेत. (Marathi Tajya Batmya)

अशोक नगर येथील भाजी मंडईत टोमॅटो 160 रुपये किलोच्या पुढे विकला जात आहे. शहरातील अभिषेक मोबाईल शॉपीतील तरुण व्यावसायिक अभिषेक अग्रवाल यांनी सांगितले की, आजच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाईल शोरूममध्ये विविध ऑफर्स दिल्या जातात. अशा स्पर्धेच्या काळात जेव्हा आम्हाला कळले की, टोमॅटोचे भाव वाढले आहेत आणि भाजी बाजारात टोमॅटो 160 रुपये किलोने विकला जात आहे, तेव्हा आम्ही स्मार्टफोन खरेदीवर 2 किलो टोमॅटो मोफत देण्याचा निर्णय घेतला.(Latest Marathi News)

मोबाईल शोरूमचे मालक सांगतात की, जेव्हापासून त्यांनी दुकानात ही योजना लागू केली आहे, तेव्हापासून ग्राहकांची संख्या वाढली आहे, या काळात अनेक लोक येऊन विचारत आहेत की, या दुकानात टोमॅटोची ऑफर सुरू आहे, ती रोज आहे का? ग्राहकांना 50 किलो पेक्षा जास्त टोमॅटो ऑफर म्हणून देण्यात येणार आहेत. सध्या या घटनेची जोरदार चर्चा आहे. एका हिंदी वेबसाईटने या संबधीचे वृत्त दिलं आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT