Sambit Patra_Raman Singh Sakal Media
देश

Toolkit Case: संबित पात्रा, रमन सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल

काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेकडून एफआयआर दाखल

Amit Ujagare (अमित उजागरे)

रायपूर : टूलकिट प्रकरणी (Toolkit Case) भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष रमन सिंह यांच्याविरोधात काँग्रेसच्या विद्यार्थी संघटना NSUIनं गुन्हा दाखल केला आहे. या दोघांवर आरोप आहे की, त्यांनी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या (AICC) संशोधन विभागाचं बनावट लेटरहेड बनवलं आणि या लेटरहेडवर खोटा आणि स्वरचित मजकूर छापला. दरम्यान, पात्रा यांनी याप्रकरणी चौकशीसाठी छत्तीसगड पोलिसांकडे सात दिवसांची मुदत मागितली आहे. तर रमन सिंह यांची उद्या चौकशी होणार आहे. (Toolkit Case FIR filed against Sambit Patra and Raman Singh)

एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष आकाश शर्मा यांच्या तक्रारीवरुन खोटी बातमी पसरवल्याप्रकरणी आणि चिथावणीखोर प्रकार केल्या प्रकरणी १९ मे रोजी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तसेच भाजप नेत्यांनी बनावट लेटरहेडचा वापर करुन स्वरचित मजकूर प्रकाशित केला, असा दावाही शर्मा यांनी केला आहे. यानंतर पोलिसांनी या दोघांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.

दरम्यान, रायपूर पोलिसांनी रमन सिंह यांना २४ मे रोजी म्हणजेच उद्या दुपारी साडेबारा वाजता आपल्या घरी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांकडून त्यांच्या घरीच त्यांची चौकशी केली जाईल असं सांगितलं जात आहे. तर संबित पात्रा यांना रविवारी संध्याकाळी ४ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रायपूरच्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. यावर पात्रा यांनी पोलिसांनी हजर राहण्यास सात दिवसांचा कालावधी मागितला आहे.

काय आहे टुलकिट प्रकरण?

भाजपच्या अनेक नेत्यांनी ट्विटरवर एक टूलकिट शेअर केलं होतं यामध्ये काँग्रेसच्या लेटरहेडवर कोरोना महामारीच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान आणि सरकारला घेरण्याचे प्रकार सांगण्यात आले होते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा खराब करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मीडियाची मदत घेणे आणि नव्या म्युटेट स्ट्रेनला 'भारतीय स्ट्रेन' म्हणण्यास सांगितलं आहे. तसेच सोशल मीडियावर याला 'मोदी स्ट्रेन' असं संबोधलं जावं असा सल्ला देण्यात आला आहे.

काँग्रेसने फेटाळले आरोप

काँग्रेसने हे टुलकिट बनावट असल्याचं म्हटलं आहे. तसेच काँग्रेसच्या लेटरहेडचा चुकीचा वापर केल्याचा भाजपवर आरोप केला आहे. काँग्रेस प्रवक्ते राजीव गौडा यांनी म्हटलं की, "जेव्हा देश कोविडमुळे अस्ताव्यस्त झाला आहे. या काळात जनतेला दिलासा देण्याऐवजी भाजप 'फेक न्यूज' पसरवण्यात व्यस्त आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी भाजपला 'बिल्कुल झूठ पार्टी' असं संबोधलं आहे. काँग्रेसने या प्रकरणी नड्डा आणि भाजप नेत्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Manifesto: विषय बदलले नाही प्रश्न तेच.. आता आम्ही करू; असं म्हणत राज ठाकरेंचा जाहीरनामा प्रसिद्ध, काय आहे खास?

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

Narayana Murthy: UPSC परीक्षेतून नव्हे तर अशा पद्धतीने करा IAS-IPSची निवड; नारायण मूर्तींनी PM मोदींना केले आवाहन

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

SCROLL FOR NEXT