देश

टॉप 10 | 2021 वर्षात व्हायरल झालेले व्हिडीओ पाहिले का?

ओमकार वाबळे

कोरोना आणि लॉकडाऊन दरम्यान २०२० प्रमाणे २०२१ मध्ये देखील अनेक भारतीय व्हिडीओ ट्रेंडिंगमध्ये होते. सुरुवातीच्या काळात लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात लोक घरातच असायचे. त्यामुळे सोशल मीडियावर ट्रेंडिंग काँटेंटची भर पडत होती.

सोशल मीडियाने यामध्ये पूर्वीपेक्षा जास्त भरभराट केली. कारण मीम्स आणि व्हायरल व्हिडिओंमुळे त्यांच्या आरोग्याबद्दल, उपजीविकेबद्दल आणि भविष्याबद्दल चिंता असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटलेलं पाहायला मिळालं.

खालीलपैकी बर्‍याच व्हिडिओजनी इंटरनेटवर तुफान मजा आणली. यातले काही ह्रदयस्पर्शी, काही भावनिक आहेत. तर काही तुमची तब्येत खूश करतील. 2021 मध्ये सोशल मीडियावर सर्वाधिक पाहिले गेलेल्या व्हिडीओचा हा एक रिकॅप!

1. पावरी हो राही है

2021 चा सर्वात लोकप्रिय व्हायरल व्हिडीओ नक्कीच 'पावरी हो राही है' होता. ही पाकिस्तानी दाननीर मोबीनची एक छोटी क्लिप होती. व्हिडिओला प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि एक मीमफेस्ट सुरू झाला. संगीतकार यशराज मुखते यांनी 'रसोई में कोन था रीमिक्स'साठी गेल्या वर्षी व्हायरल झालेल्या तिच्या व्हिडिओचा मॅशअप तयार केल्यानंतर याचा ट्रेंड आणखी वाढला.

2. बसपन का प्यार

छत्तीसगडमधील एक लहान मुलगा सहदेव दिर्डो हा पण एका गाण्याच्या व्हिडीओनंतर व्हायरल झाला. 'बचपन का प्यार' व्हिडिओने सगळ्यांना वेड लावलं. या व्हिडीओची सोशल मीडियावर तुफान चर्चा झाली होती. सेलिब्रिटींनीही त्यावर पुन्हा रिल्स केले. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही त्याचा सत्कार केला.

3. डॉ. अग्रवाल यांच्या पत्नी फोनवरच ओरडल्या

डॉ. केके अग्रवाल हे लाईव्ह सेशनमध्ये असतानाच त्यांच्या पत्नी जोरात ओरडल्या. एका लाईव्ह सत्रात उपस्थित असताना त्यांच्या पत्नीशी बोलत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यांच्या पत्नी देखील प्रोफेसर आहेत.

डॉ. के.के. अग्रवाल यांनी लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात लस घेतली. त्यांची पत्नीही डॉक्टर आहे. मात्र पत्नीला सोडून लस घेतल्याचं कळल्यानंतर त्या भडकल्या. त्यांचा फोनकॉल सुरू असल्याचं दिसलं. अग्रवाल यांना लाईव्ह असतानाच पत्नीच्या क्रोधाचा सामना त्यांना करावा लागला. दुर्दैवाने, कोरोनाव्हायरसशी दीर्घ लढाईनंतर 62 वर्षीय हृदयरोगतज्ज्ञ काही महिन्यांनंतर मरण पावले.

4. श्वेता तुझा माइक चालू आहे

श्वेता भारतात ट्विटरवर ट्रेंड झाली आणि ऑनलाइन क्लासच्या लीक झालेल्या झूम कॉलमुळे नेटिझन्समध्ये मीम्ससह हॅशटॅगचा पूर आला. श्वेता नावाची मुलगी तिचा मायक्रोफोन म्यूट करायला विसरली. यामध्ये श्वेता तिच्या बॉयफ्रेंडसोबत घडलेल्या प्रसंगांची माहिती देत होती.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, मुलगी एका मुलाचे काही खासगी तपशील शेअर करत आहे. यामुलाने तिला सर्वकाही गुप्त ठेवायला सांगितलं होतं.

5. झूम कॉल सुरू असतानाच बायकोने घेतलं चुंबन

आपल्या देशात आणखी एक झूम कॉल मोठ्या प्रमाणत ट्रेंडिग होत होता. एका महिलेने तिचा नवरा लाईव्ह चॅनेलवर झूमकॉलमध्ये असताना त्याचं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. ही व्यक्ती अर्थकारणावर बोलत होती. जीडीपीचा निर्यात व्यवसायावर कसा परिणाम होतो, याबद्दल संबंधित माणूस गंभीर चर्चा करत असतो. पण पत्नी मागून येते. आणि त्याला किस करते.

6. केरळच्या मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा रासपुटिनवर डान्स

हा व्हायरल डान्स व्हिडीओ केरळमधील त्रिशूर मेडिकल कॉलेजच्या कॉरिडॉरमध्ये शूट करण्यात आला होता. त्यात दोन वैद्यकीय विद्यार्थी बोनी एमच्या 1978 च्या हिट गाण्याच्या रासपुटिनच्या तालावर नाचताना दिसत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, इंस्टाग्रामवर लाखो लाईक्स मिळाले आणि काही काळ वादातही सापडला.

7. 'सोचा क्या' गाण्यावर पीपीई किटमधील डॉक्टर नाचतात

हा व्हिडीओ खूपच हृदयस्पर्शी होता. त्यामध्ये गुजरातच्या वडोदरा येथील पारुल सेवाश्रम रुग्णालयाचे कर्मचारी नृत्य करून कोविड रुग्णांना खूश करण्याचा प्रयत्न करताना दिसले. PPE किट घातलेले अनेक डॉक्टर आणि परिचारिका 1990 च्या सनी देओलच्या 'घायल' चित्रपटातील 'सोचना क्या, जो भी होगा देखा जायेगा' या गाण्यावर व्यायाम करताना आणि नाचताना दिसल्या. काही रुग्ण उत्साहाने एकतर नाचायला लागले. आणि काही जण उभे राहून किंवा बेडवर बसून डान्स करून डॉक्टरांसोबत सामील झाले.

8. रेमडेसिव्हिर की रेमो डिसुझा?

कोरिओग्राफर-फिल्ममेकर रेमो डिसूझा यांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओवर आनंदाने प्रतिक्रिया दिली. या व्हिडीओत एक माणूस रेमडेसिव्हिर इंजेक्शनचे नाव 'रेमो डिसूझा' असं घेतो. तो वारंवार चुकीचा उच्चार करत असतो. हा व्हिडीओ कोरिओग्राफरने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर रिपोस्ट केला.

9. लॉकडाऊनपूर्वी दिल्लीतील काकू दारूच्या दुकानात धावल्या

सीएम अरविंद केजरीवाल यांनी एप्रिल 2021 मध्ये दिल्लीत आठवडाभराच्या लॉकडाऊनची घोषणा केली. यामुळे दिल्लीतील अनेक भागात दारूच्या दुकानांमध्ये गर्दी लोटली. दारू खरेदी करण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्यांमध्ये एक वृद्ध महिला होती. तिने लॉकडाऊन दरम्यान दारूची दुकाने उघडी ठेवण्याचे सरकारला आवाहन केले आणि तिच्या उत्तराने नेटकऱ्यांना वेड लागलं. या महिलेने सांगितलं की कोणत्याही लशीची तुलना अल्कोहोलशी होऊ शकत नाही. कारण फक्त अल्कोहोल हेच खरे औषध आहे. वृद्ध महिलेच्या धाडसी आणि बिंदास वृत्तीने अनेकांचे मनोरंजन केलं.

10. 'लव्ह यू जिंदगी'

डॉ मोनिका लंगेह यांनी कोविड-19 आपत्कालीन वॉर्डमध्ये शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांच्या 2016 च्या डिअर जिंदगी या चित्रपटातील लव्ह यू जिंदगी गाताना तिच्या 30 वर्षीय रुग्णाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. तिची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली. तिची प्रकृती गंभीर झाल्यानंतर अखेर दुर्दैवी मृत्यू झाला. अनेकांनी ट्विटरवर तरुण रुग्णाच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bandra Kurla Complex Metro Station वर मोठी घटना! सुमारे 40-50 फूट खोलवर लागली आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' दाव्यावर शरद पवारांचा पलटवार, म्हणाले- त्यांनी माझं स्थान ओळखलं पाहिजे

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

SCROLL FOR NEXT