Train Accident in Andhra Pradesh 
देश

"पॅसेंजर ट्रेन रुळावर उभी होती त्याचवेळी मागून दुसरी ट्रेन आली अन्..."; आंध्र प्रदेशात भीषण रेल्वे अपघात, 6 ठार, 25 जखमी

Sandip Kapde

Train Accident in Andhra Pradesh: आंध्र प्रदेशातील विजयनगरममध्ये दोन रेल्वे गाड्यांमध्ये धडक झाली आहे. पॅसेंजर ट्रेन उभी होती त्याचवेळी मागून दुसरी पॅसेंजर ट्रेन आली. मागून आलेल्या धडकेत पॅसेंजर ट्रेनच्या तीन बोगी रुळावरून घसरल्या. या दुर्घटनेत आतापर्यंत 6 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघातानंतर मदत आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर (ट्रेन क्र. ०८५०४) विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर (ट्रेन क्र. ०८५३२) कोथवलसा 'मंडल' येथे कंटकपल्लीच्या टक्करानंतर रुळावरून घसरली. या घटनेबाबत, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी तात्काळ मदत उपाययोजना करण्याचे आणि विजयनगरमजवळील जिल्ह्यांमधून शक्य तितक्या रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.

नेमकं काय घडलं?

विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर ट्रेन ओव्हरहेड केबल कट झाल्यामुळे उभी होती. त्याचवेळी विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर ट्रेन त्याच रुळावर मागून येऊन धडकली. या धडकेनंतर पॅसेंजर ट्रेनच्या तीन बोगी रुळावरून घसरल्या. ही धडक इतकी जोरदार होती की एका बोगीचे मोठे नुकसान झाले. (Latest Marathi News)

या अपघातात पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफला देण्यात आली आहे. अपघात निवारण गाडीही घटनास्थळी पोहोचली आहे. जखमींना रुग्णवाहिकेतून स्थानिक रुग्णालयात नेण्यात येत आहे, अशी माहिती या घटनेबाबत विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी दिली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT