नवी दिल्ली : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची आठवण काढत त्यांना अभिवादन केलं आहे. कालच अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा पार पडली. यानंतर मोदींनी बाळासाहेबांची आठवण काढली आहे. (trubute to shivsena balasaheb thackeray on his 98th birth anniversay by pm narendra modi)
मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं की, बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. ते एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होतं ज्यांचा महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक पटलावर पडलेला प्रभाव अतुलनीय आहे. असंख्य लोकांच्या हृदयात त्यांच्या नेतृत्वामुळं, त्यांच्या आदर्शांप्रती अखंड समर्पण आहे. तसेच गरीब आणि दलितांसाठी काम करण्यासाठी ते कायम वचनबद्ध राहिले, असंही मोदींनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)
बाळासाहेब ठाकरेंची आज ९८ वी जयंती आहे. यानिमित्त राज्यात शिवसेनेच्यावतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरेंच्या गटाचा आज नाशिकच्या सातपूरमध्ये अधिवेशन पार पडणार आहे. तसेच संध्याकाळी गोल्फ मैदानात सभा होणार आहे. कालपासूनच ठाकरे गटानं नाशिकमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे.
राम मंदिराचं स्वप्न पूर्ण
अयोध्येत राम मंदिर व्हावं असं बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. बाबरी मशीद पतनावेळी त्यांनी या कृतीचं समर्थन करत शिवसेनेच्यावतीनं जबाबदारीही घेतली होती. त्यामुळं या लढ्यात त्यांचंही नाव घेतलं जातं. कालच पंतप्रधान मोदींच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन पार पडलं. त्यामुळं एकाअर्थी बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती झाली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.