देश

Tirupati Laddu Row: तिरुपती लाडू प्रकरणात मोठी अपडेट! देवस्थानने 'या' संस्थेविरोधात दाखल केली तक्रार

संतोष कानडे

Complaint Against AR Dairy: आंध्र प्रदेशातल्या तिरुपती देवस्थानच्या लाडू प्रसादावरुन सध्या घमासान सुरु आहे. या लाडूमध्ये जनावरांची चरबी आणि माशांच्या तेलाचा वापर होत असल्याचं लॅबच्या रिपोर्टवरुन स्पष्ट झालं आहे. त्यानंतर आता तिरुपती देवस्थानने एका डेअरीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

टीटीडी अर्थात तिरुमला तिरुपती देवस्थानने जनरल मॅनेजर पी मुरली कृष्णा यांनी ईस्ट पोलिस ठाण्यात एआय डेअरी फूड प्रायव्हेट लिमिटेड, डिंडीगुल या संस्थेविरोधात विरोधात तक्रार दाखल केली आहे. यापूर्वी सरकारने पोलिस अधिकारी सर्वश्रेष्ठ त्रिपाठींच्या नेतृत्वामध्ये एसआयटी गठीत केली आहे.

FSSAIने एआर डेअरीला विचारले प्रश्न

एफएसएसएआयने एआर डेअरी फूड प्रायव्हेट लिमिटेडला नोटीस पाठवून खाद्य सुरक्षा मानक अधिनियम २०११च्या निकषांचं उल्लंघन केल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे त्यांचा परवाना का रद्द केला जाऊ नये? अशी नोटीस पाठवली आहे. केंद्रीय प्रयोगशाळेत तुपाच्या तपासणीनंतर तफावत आढळून आली आल्याचं FSSAIने म्हटलं आहे.

टीटीडीच्या तूप खरेदी समितीने पुरवठा झालेले सर्व सॅम्पल्स गुजरातच्या आनंद येथील एनडीडीबी काल्फ लॅबमध्ये पाठवले होते. तुपाच्या मानकांमध्ये तफावत असल्याचं FSSAIच्या निदर्शनास आलेलं आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी नुकतंच मागच्या सरकारवर आरेप केले होते. वायएसआरसीपी सरकारच्या तिरुपती देवस्थानमध्ये लाडू प्रसादासाठी वापरण्यात येणाऱ्या तुपामध्ये जनावरांची चरबी मिसळलेली होती, असं म्हटलं. या दाव्यानंतर तपासासाठी एक विशेष पथक गठीत करण्यात आलं.

दरम्यान, तिरुपती मंदिरामध्ये पुजाऱ्यांनी रविवारी शुद्धीकरणासाठी पूजापाठ केला होता. मंदिर प्रशासनाने याबाबत माहिती देताना लाडू प्रसादाला पावित्र्य बहाल केल्याचं म्हटलं होतं. या प्रकरणी केंद्र सरकार काय भूमिका घेणार, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai School Holiday: मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी जाहीर! शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

मुंबईत मुसळधार! लोकलसेवेवर मोठा परिणाम, ट्रेन तब्बल ३० ते ४५ मिनिटे उशीराने, स्थानकांवर प्रवाशांची गर्दी

Politics: लाडकी बहीण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य, भाजप आमदारामुळे महायुतीचं सरकार अडचणीत?

Rain Update: पालघर आणि नाशिकसाठी रेड अलर्ट, तर मुंबईसह पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी, वाचा 26 सप्टेंबरला कशी असेल पावसाची स्थिती?

Pune Baner Road Traffic Jam: पुण्यातील बाणेर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी! कामावरुन घराकडं निघालेले पुणेकर वैतागले

SCROLL FOR NEXT