Twitter Sakal
देश

ट्विटर अल्गोरिदमकडून उजव्या विचारसरणीला प्राधान्य : रिपोर्ट

सकाळ डिजिटल टीम

सध्या सोशल मिडीया हे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. सोशल मिडीयाचा सामान्य नागरिकांमध्ये वाढलेला वापर हा त्यांच्यावर कित्येक पटीने प्रभाव टाकत असते. दरम्यान मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरने (Twitter) एक स्टडी प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये द्विटरचा अल्गोरिदम हा वापरकर्त्यांच्या टाइमलाइनवर ठराविक राजकीय विचारांच्या कंटेंटला प्राधान्य देत असल्याचे समोर आले आहे. ट्विटरने केलेल्या याभ्यासात अल्गोरिदम असे का करतो याबद्दल विश्लेषण करण्यात आले आहे.

ट्विटरच्या रिसर्च टीमने 1 एप्रिल ते 15 ऑगस्ट 2020 दरम्यान निवडक अधिकाऱ्यांनी त्यांच्या अकाऊंटवरुन पोस्ट केलेल्या काही ट्विटचे विश्लेशन केले. हे अधिकारी कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, जपान, स्पेन, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्सचे ​​होते. त्यांनी ट्विटरवर लोकांद्वारे शेअर केलेल्या बातम्यांच्या ट्विट केलेल्या लिंक्सचा अभ्यास केला गेला आणि हे समजून घेण्याचा प्रयत्न केला की अल्गोरिदम सामान्यतः राजकीय कंटेंटला का प्राधान्य देतो. यामध्ये विश्लेषकांना असे आढळले की, राजकीय पोस्ट केलेले ट्वीटमद्ये जर्मनी वगळता इतर सर्व देशांत उजव्या विचारसरणीशी निगडीत राजकीय पोस्ट्स (algorithms amplify right leaning political content) या डाव्या विचारसरणी संबंधीत राजकीय पोस्टपेक्षा जास्त दाखवल्या गेल्या.

हीच बाब बातम्यांच्या लिंक बद्दल देखील समोर आली. बातम्या कोणत्या राजकीय विचारसरणीकडे झुकलेल्या आहेत हे ठरवण्यासाठी ट्विटरने थर्ड पार्टी संशोधकांची मदत घेतली आणि या बातम्यांच्या लिंकचे विश्लेषण केले. या अभ्यासादरम्यान संशोधकांना असे आढळून आले की, अल्गोरिदम उजव्या विचारसरणीकडे झुकलेल्या बातम्यांच्या लींकना डाव्या- विचारसरणीकडे झुकलेल्या बातम्यांच्या लिंक्सपेक्षा अधिक प्राधान्य देतो.

ट्विटरला याची खात्री नाही की, हे नेमके कशामुळे झाले. कंपनीने सांगितले की, हे सर्व गुंतागुंतीचे असून वापरकर्ते अल्गोरिदमनुसार दिसणारे ट्वीट किंवा लेटेस्ट पोस्ट करण्यात आलेले ट्विट्स यापैकी काय पाहायचे ठरवू शकतात, तसा पर्याय ट्विटरमध्ये देण्यात आला आहे. तसेच एखादी व्यक्ती अल्गोरिदम नुसार दिसणाऱ्या ट्विटला कसा प्रतिसाद देते, तसेच सिस्टमची रचना कशी केली आहे त्यानुसार त्याच्या होम टाईमलाईवर ट्विट्स वापरकर्त्यांना दिसतात.

अभ्यासामध्ये असेही आढळले आहे की, राजकीय आशय असलेले कोणत्याही राजकीय पक्षाचे ट्विट्स ते सत्तेत असतील किंवा नसतील तरी त्याला अल्गोरिदम जास्त प्राधान्य देतो. मात्र एकाच पक्षातील दोन लोकांना समान प्राधान्य मिळत नाही. कारण कंटेंट रेकमेंड करताना ट्विटरला त्यांच्यातील संबंध आणि राजकीय विचारसरणी लक्षात येत नाही. ट्विटरवर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे संचालक रुम्मन चौधरी यांनी एका ब्लॉग पोस्ट सांगीतले की, अल्गोरिदमिक अॅम्प्लिफिकेशन डिफॉल्टनुसारअसे करत नाही. अल्गोरिदम जर काही ठरावीक लोकांना प्राधान्य देत असेल तर हे अडचण ठरु शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT