Twitter Replied To Rahul Gandhi e sakal
देश

'...म्हणून फॉलोअर्स कमी झाले असावे', राहुल गांधीच्या पत्राला Twitter चं उत्तर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : काही दिवसांपासून ट्विटरवरील माझे फॉलोअर्स वाढत नाहीत. ट्विटर सरकारच्या दबावाखाली येऊन हे सर्व करतंय, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला. याबाबत त्यांनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल (Twitter CEO Parag Agrawal) यांना पत्र देखील लिहिले. त्यावर आता ट्विटरने उत्तर दिले आहे.

ट्विटरवरील खाती विश्वासार्ह आहे की नाही हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो. अशावेळी काही फेक अकाऊंट डिलिट करण्यात येतात. त्यामुळे फॉलोअर्सच्या संख्येत चढ-उतार होऊ शकते, असं उत्तर ट्विटरकडून देण्यात आलं आहे. (Rahul Gandhi Twitter Followers Concerns)

प्लॅटफॉर्म मॅनिप्युलेशन आणि स्पॅमवरील आमच्या धोरणांचे उल्लंघन केल्याबद्दल आम्ही दर आठवड्याला लाखो खाती काढून टाकतो. काही खात्यांमध्ये किरकोळ फरक दिसून येतो, तर काही खात्यांचे फॉलोअर्स कमी होण्याचं प्रमाण जास्त असते. काही अकाऊंटला खरंच विश्वासार्ह आहेत का हे तपासण्यासाठी ट्विटर कॅप्चा चाचणी पूर्ण करण्यास सांगते. अशावेळी काही अकाऊंटवरून ही चाचणी पूर्ण न केल्यास त्यांची खाती हटवण्यात येतात. त्यामुळे देखील फॉलोअर्सची संख्या कमी होऊ शकते. तसेच खाती काही काळासाठी ब्लॉक होऊ शकतात, असंही ट्विटरनं म्हटलं आहे.

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले? -

सरकारच्या काही धोरणांवर टीका-टीप्पणी केल्याचे काही व्हिडिओ आणि फोटो दडपण्यात आल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. या पत्रात त्यांनी काही डेटा विश्लेषण देखील दिले आहे. ट्विटर मोदी सरकारच्या दबावाखाली माझे फॉलोअर्स वाढू न देण्यासाठी प्रयत्न करतंय. ऑगस्ट २०२१ मध्ये माझं अकाऊंट कुठलंही कारण न देता ब्लॉक करण्यात आलं. त्यावेळी जितके फॉलोअर्स होते तितकेच आजही आहेत. अजून फॉलोअर्स वाढलेले नाहीत. ट्विटरला सरकारचा मोहरा बनू देऊ नका, असं राहुल गांधींनी पत्रात म्हटलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT