POlice Sakal
देश

Make A Wish: दोन कॅन्सरग्रस्तांची पोलिस अधिकारी होण्याची इच्छा पूर्ण

'मेक अ विश' या संस्थेमार्फत हा उपक्रम राबवण्यात आला होता.

सकाळ डिजिटल टीम

बंगळूर : मिथिलेश आणि मोहम्मद असे दोघजण. दोघेही कॅन्सरग्रस्त, पण पोलिस अधिकारी होण्याची दोघांचीही इच्छा होती. कॅन्सरमुळे आपली ही इच्छा पूर्ण होऊ शकणार नाही हे दोघांनाही माहिती होतं पण त्यांची पोलिस अधिकारी होण्याची इच्छा 'मेक अ विश' या संस्थेने पूर्ण केली आहे. मिथिलेश आणि मोहम्मद सलमान या १३ वर्षाच्या मुलांना पोलिस गणवेश घालून एका दिवसासाठी अधिकारी बनवण्यात आलं होतं. 'मेक अ विश' या संस्थेच्या माध्यमातून हा प्रयोग राबवला गेला होता.

(Two Cancer Sufferers Fulfill Their Wish to Become Police Officers)

कॅन्सरग्रस्त असलेले मिथिलेश आणि मोहम्मद सलमान हे दोघेही बंगळूर येथे हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असून कॅन्सरवर उपचार चालू आहेत. मेक अ विश या संस्थेच्या माध्यमातून त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे. त्यांनी गणवेश घालून जेव्हा पोलिस स्टेशनमध्ये एंट्री केली तेव्हा इतर पोलिस अधिकाऱ्यांकडून त्यांना सॅल्यूट मारण्यात आला. त्याचबरोबर मिथिलेश आणि मोहम्मद सलमान यांनी पोलिसांची पूर्ण दिवसभराची दिनचर्या जाणून घेतली आहे.

यावेळी कर्मचार्‍यांनी कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकरण त्या दोघांपुढे सादर केले होते. त्यानंतर दोघांनीही तक्रार ऐकूण घेत आवश्यक निर्देश दिले. दोघांनीही पोलिस कर्मचार्‍यांसह दुपारचे जेवण केले होते त्यानंतर पोलिस अधिकार्‍यांनी त्यांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान केला. पोलिस हा अनेकांना संकटातून मुक्तता देऊ शकतो म्हणून मला पोलिस व्हायला आवडेल असं मत सलमानने व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर मिथिलेशला वाहतूक व्यवस्थपनात रस असल्याचं त्याने सांगितलं आहे.

“संस्थेच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून, आयपीएस अधिकारी होण्याची इच्छा असलेल्या दोन कॅन्सरग्रस्त मुलांनी कोरमंगला पोलिस स्टेशन येथील दक्षिण-पूर्व विभागात डीसीपीची भूमिका बजावली,” असं सी.के. बाबा, डीसीपी, दक्षिण-पूर्व विभाग यांनी सांगितलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Patil: पवारांची साथ मिळूनही हर्षवर्धन पाटलांसाठी निवडणूक सोप्पी नाही? घरातूनच बसला धक्का

Pune News : नव्या पाहुण्यासाठी हवा सरकारी दवाखाना; खासगीपेक्षा अधिक पसंती, अडीच वर्षांत ६९ हजार प्रसूती

Sakal Podcast: अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार?

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT