Karnataka CM Siddaramaiah vs DK Shivakumar
Karnataka CM Siddaramaiah vs DK Shivakumar esakal
देश

कर्नाटकात काँग्रेसचं सरकार धोक्यात? 'या' पदावरून पक्षात गटबाजी, DK शिवकुमारांचा प्रभाव कमी करण्यासाठी डावपेच सुरू

सकाळ डिजिटल टीम

शिवकुमार हायकमांडसमोर अहवाल सादर करू शकतात. हा समाज काँग्रेससोबत नाही, हे त्यांना हायकमांडच्या निदर्शनास आणून द्यायचे आहे.

बंगळूर : कर्नाटकात आणखी तीन उपमुख्यमंत्र्यांच्या मागणीवर काँग्रेस हायकमांडचा (Congress High Command) निर्णय अंतिम असेल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी सांगितले. काही मंत्री वीरशैव-लिंगायत, एससी/एसटी आणि अल्पसंख्याक समुदायातील नेत्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यासाठी आग्रही आहेत. सध्या वक्कलिग समाजातील डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) हे सिद्धरामय्या मंत्रिमंडळात एकमेव उपमुख्यमंत्री आहेत.

सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) म्हणाले की, हायकमांड जो काही निर्णय घेईल तो अंतिम असेल. शिवकुमार यांना रोखण्यासाठी सिद्धरामय्या समर्थक आणि काँग्रेसमधील एका गटाचे म्हणणे आहे. या चर्चेदरम्यान ते दोन-तीन उपमुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. सरकार आणि पक्ष दोन्हीमधील शिवकुमार यांचा प्रभाव कमी करण्यासाठी हे डावपेच सुरू असल्याची चर्चा आहे.

सहकार मंत्री के. एन. राजण्णा, गृहनिर्माण मंत्री बी. झेड. जमीर अहमद खान, सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी आणि इतर काही मंत्री हे सिद्धरामय्या यांच्या जवळचे मानले जातात. या मंत्र्यांनी पुन्हा एकदा आणखी तीन उपमुख्यमंत्र्यांसाठी मागणी केली. मुख्यमंत्रीपदासाठी शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यात तीव्र स्पर्धा असताना शिवकुमार हे एकमेव उपमुख्यमंत्री असतील, असा निर्णय काँग्रेस हायकमांडने घेतला होता.

शिवकुमारांची प्रतियोजना

अल्पसंख्याक, मागासवर्गीय आणि दलित समुदायाचे मंत्री हायकमांडला सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत की, उपमुख्यमंत्री शिवकुमार लोकसभा निवडणुकीत वक्कलिगा मते आकर्षित करण्यात अपयशी ठरले आहेत. पण शिवकुमार यांनी या रणनीतीला विरोध करण्यासाठी आणखी एक योजना आखल्याचे सांगितले जाते. शिवकुमार यांनी खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे अहवाल तयार केला आहे. अहवालानुसार मागासवर्गीय आणि दलित समुदायातील मतदारांनी गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत विशेषतः जुन्या म्हैसूर भागातील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा दिला नाही.

शिवकुमार हायकमांडसमोर अहवाल सादर करू शकतात. हा समाज काँग्रेससोबत नाही, हे त्यांना हायकमांडच्या निदर्शनास आणून द्यायचे आहे. सिद्धरामय्या हे मागास समाजातील असल्याने विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या कुरुबांनीही लोकसभा निवडणुकीत पक्षाला पूर्ण पाठिंबा दिला नाही. जुन्या म्हैसूरमध्ये पक्षाला फक्त हासन आणि चामराजनगर लोकसभा मतदारसंघात विजय मिळवता आला.

१५ आमदार दिल्लीला जाणार

दरम्यान, माजी मंत्री विनय कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १५ वीरशैव-लिंगायत आमदारांचे शिष्टमंडळ लवकरच नवी दिल्लीत पक्षप्रमुखांना भेटण्याची शक्यता आहे. सिद्धरामय्या यांचे निष्ठावंत म्हणून त्यांना योग्य वागणूक मिळत नसल्याचे सांगत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याची शक्यता आहे. हे आमदार नगरविकास आणि नगरनियोजन मंत्री भैरती सुरेश आणि सहकार मंत्री के. एन. राजण्णा यांच्या विरोधात तक्रार करू शकतात, असे सूत्रांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahesh Jethmalani: अदानीला संपवण्यासाठी चीन प्रयत्न करतोय का? महेश जेठमलानींचे धक्कादायक खुलासे

Snake Bite to Youth: सापानं चावा घेतल्यानंतर त्यानंही घेतला चावा! सापाचा झाला मृत्यू पण तरुणाचं काय झालं?

Bajaj Freedom 125: बजाजने लॉन्च केली जगातील पहिली CNG बाईक! बजाज फ्रीडम 125 भारतात लॉन्च, किती आहे किंमत?

ZIM vs IND 1st T20 Playing 11 : शुभमन गिल मित्राला संधी देणार; सीएसकेचा कर्णधार ऋतुराजला बसावं लागणार बेंचवर?

Arun Kanade: ड्रायव्हर ते टीम इंडियाची ड्रेसिंग रुम... विधान भवनात सत्कार झालेले अरुण कानाडे आहेत तरी कोण?

SCROLL FOR NEXT