Jammu-Kashmir Terrorist Attack Esakal
देश

Jammu Kashmir: दोन जवानांचे दहशतवाद्यांकडून अपहरण, गोळी लागलेली असताना एकजण तावडीतून निसटला; दुसऱ्या जवानाचा...

रोहित कणसे

Jammu and Kashmir Latest News Updates: जम्मू काश्मीरच्या अनंतनाग भारतीय लष्कराच्या जवानांचे अपहरण केलेल्या दोन जवानांपैकी एकजण गोळी लागलेली असताना, दहशदवाद्यांच्या तावडीतून सुटून आल्याची घटना समोर आली आहे. तर दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या एका लष्कराच्या जवानाचा मृतदेह आढळून आला आहे. या जवानाचे पार्थिव अनंतनागच्या जंगलात सापडले असून मीडिया रिपोर्टनुसार या जवानाच्या शरीरावर गोळ्या लागल्याच्या असंख्य खुणा आढळल्या आहेत.

मृतदेह सापडलेल्या या जवानाचे नाव हिलाल अहमद असे सांगितले जात आहे. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या जवानाला एकापेक्षा जास्त गोळ्या मारण्यात आल्या आहेत. तर शरीरावर चाकूने वार केल्याच्या कुठल्याही खुणा आढळल्या नाहीत.

यापूर्वी लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अनंतनागमध्ये लष्कराच्या एका जवानाचे दहशतवाद्यांना अपहरण केल्याची माहिती दिली होती. टेरिटोरियल आर्मीच्या १६१ यूनिटच्या एका जवानाचे दहशतवाद्यांनी अपहरण झाल्याचे त्यांनी सांगितले होते.

विशेष म्हणजे सुरूवातीला दोन जवानांचे अपहरण करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. सांगण्यात आले की, अनंतनागच्या वनक्षेत्रातून दोन जवानांचे अपहरण करण्यात आले होते. मात्र एक जवानाला गोळी लागलेली असतानाीही तो दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटून पळून येण्यात यशस्वी झाला.

याआधी भारतीय लष्कराच्या श्रीनगर येतील चिनार कोरने सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली होती की, गुप्त माहितीच्या आधारे लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी कोरनाग येथे इतर एजन्सीसोबत मिळून आठ ऑक्टोबर रोजी संयुक्त दहशतवादविरोधी ऑपरेशन सुरू केले होते. हे ऑपरेशन रात्रभर सुरु होते, ज्यामध्ये एक जवान बेपत्ता झाला होता.

दरम्यान या दोन जवानांचे अनंतनागच्या कोनरनागमध्ये लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या जॉइंट अँटी टेरर ऑपरेशन दरम्यान अपहरण करण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमी जवानास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या जवानाची स्थिती स्थिर आहे. या बेपत्ता जवानाच्या शोधासाठी परिसरात शोध मोहिम चालवण्यात आली होती.

ही घटना जम्मू काश्मीरमध्ये आठ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी घडली होती. याआधी ऑगस्ट महिन्यात अनंतनागमध्येच दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले होते.तर तीन जवान जखमी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Government: मोदींची खास योजना; महिलांना मोफत वॉशिंग मशीन? सरकारने दिलं स्पष्टीकरण

Latest Maharashtra News Updates : जरांगेंविरोधात पोस्ट करणाऱ्या डॉक्टरवर नाशिकमध्ये शाईफेक

ST Employees: एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 2019च्या भरतीतील 'या' उमेदवारांना सेवेत सामावून घेणार; गोगावलेंची घोषणा

Share Market Closing: दिवसभरातील चढ-उतारानंतर सेन्सेक्स निफ्टी घसरणीसह बंद; कोणते शेअर्स कोसळले?

Vedaa Movie On OTT: जॉन अब्राहम, शर्वरी वाघचा ‘वेदा' आता ओटीटीवर; वाचा कुठे आणि कधी पाहता येईल चित्रपट

SCROLL FOR NEXT