Two jawans martyred and Six terrorists killed in two encounters in Jammu and Kashmir Kulgam district  
देश

Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दल अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक! 6 दहशतवादी ठार तर 2 जवान शहीद

सकाळ वृत्तसेवा

श्रीनगर, ता. ७ (पीटीआय) : जम्मू-काश्‍मीरमधील कुलगाम जिल्ह्यात आज दोन ठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये जवानांनी सहा दहशतवाद्यांना ठार मारले. यावेळी दोन जवानही हुतात्मा झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यातील एक जवान अकोला तालुक्यातील आहे.

कुलगाम जिल्ह्यातील मोदरगम आणि चिन्नीगम या दोन गावांमध्ये शनिवारी रात्री चकमक सुरू झाली. दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरू असतानाच या चकमकी झाल्या. जवानांनी केलेल्या गोळीबारात मोदरगम येथे दोन तर चिन्नीगम येथे चार दहशतवाद्यांना मारण्यात जवानांना यश आले. या सर्वांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. मात्र या चकमकींमध्ये दहशतवाद्यांशी लढताना दोन जवानांनाही हौतात्म्य आले. दोन्ही गावांमध्ये दहशतवाद्यांना शोधण्याची मोहीम आज दुपारपर्यंत सुरू होती.

सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात कडक धोरण स्वीकारले आहे. आज एकाच दिवसांत सहा दहशतवाद्यांना मारल्याने या मोहिमेत मोठे यश मिळाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. ‘सुरक्षा दलांच्या यशामुळे जम्मू-काश्‍मीरमधील वातावरण सुरक्षित होत असून सामान्य जनताही दहशतवादाविरोधात एकजूट होत आहे. यामुळे मोहिमांना वेगही येत आहे,’ असे पोलिस महासंचालिका रश्‍मी स्वेन यांनी सांगितले.

अकोल्यातील जवान हुतात्मा

या चकमकींमध्ये हुतात्मा झालेल्या दोन जवानांमध्ये एक जण महाराष्ट्रातील अकोल्यातील आहे. प्रभाकर जंजाल असे त्यांचे नाव असून चिन्नीगाम येथे दहशतवाद्यांचा सामना करताना त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर उद्या (ता. ८) अकोल्यात अंत्यसंस्कार होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

Ajit Pawar यांच्यामुळे आमच्या पक्षाला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट

Voter Registration : मतदार नोंदणीसाठी एकाच्याच नावावर भरले तब्बल ४६२ अर्ज, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT