विजापूर (छत्तीसगड) : नक्षलवाद्यांनी केलेल्या अत्याधुनिक स्फोटकांच्या स्फोटात आज विशेष कृती दलाचे दोन जवान हुतात्मा झाला, तर इतर चार जण जखमी झाले. छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यातील तारेम भागात ही घटना घडली. या घटनेनंतर मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करताना जवानांचे हौतात्म्य व्यर्थ जाऊ देणार नाही, असे आश्वासनही दिले आहे.
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर बुधवारीच गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करत बारा नक्षलवाद्यांना ठार मारले. या यशाचे कौतुक होत असतानाच छत्तीसगडमध्ये बुधवारी मध्यरात्रीच नक्षलवाद्यांनी जवानांच्या पथकावर हल्ला केला.
बिजापूर-सुकमा-दंतेवाडा या जिल्ह्यांच्या संयुक्त सीमेवरील जंगलात नक्षलवादविरोधी मोहीम पूर्ण करून विशेष कृती दल, जिल्हा राखीव दल, केंद्रीय राखीव पोलिस दल आणि कोब्रा पथक यांचे संयुक्त पथक परतत असताना दहशतवाद्यांनी रस्त्यात पेरून ठेवलेल्या बाँबचा स्फोट झाला. या स्फोटात भारत साहू आणि सत्येर सिंह कांगे हे दोघे हुतात्मा झाले. यानंतर तातडीने या भागात जादा कुमक मागवत नक्षलवाद्यांविरोधात शोधमोहिम सुरू करण्यात आली आहे. जखमी जवानांना रायपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
नक्षलवाद्यांविरोधात जोरदार मोहिमा सुरू असल्याने त्यांना नैराश्य आले असून त्यातूनच असे हल्ले होत आहेत. मात्र, आमची लढाई सुरूच राहणार असून जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही.
- विष्णुदेव साय, मुख्यमंत्री, छत्तीसगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.