Uber Ride: आजच्या डिजिटल युगामध्ये सर्व काही एका क्लिकवर सर्व गोष्टी करू शकतात, जर तुम्हाला कुठे जायचं असेल तर लोक सहजपणे ऑनलाइन टॅक्सी बुक करू शकतात. परंतु, विचार करा की तुमची उबर राइड 62 रुपयांवरून 7.66 कोटी रुपयांवर गेली तर तुमची अवस्था काय होईल? हे ऐकायला विचित्र वाटेल पण नोएडातील एका व्यक्तीसोबत असाच काहीसा प्रकार घडला आहे, त्याने उबर वरून ६२ रुपयांची ऑटो राइड बुक केली होती आणि त्याचे बिल ७.६६ कोटी रुपये आलं.
हे प्रकरण आहे नोएडामधाल दीपक टेंगुरिया यांचं. ते नेहमीच उबर वापरतात. त्यांनी उबर इंडिया ॲप वापरून केवळ ६२ रुपयांमध्ये ऑटो राईड बुक केली. दीपक त्याच्या जागी पोहोचले तेव्हा त्यांना 7.66 कोटी रुपयांचे बिल मिळालं हे पाहिल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला.
दीपक टेंगुरिया यांच्यासोबत घडलेला हा प्रकार त्यांच्या मित्राने शेअर केला आहे. याचा व्हिडिओ त्यांचा मित्र आशिष मिश्रा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये ते दोघेही उबेरवर ऑटो राइड बुक केल्यानंतर दीपकला मिळालेल्या मोठ्या बिलाबद्दल चर्चा करताना दिसले. या प्रकरणाने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
सोशल मिडीया X वर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये 7,66,83,762 रुपये बिल असल्याचे दिसत आहे. जेव्हा दीपकने त्यांचा फोन कॅमेरावर फ्लॅश केला तेव्हा दिपककडून “ट्रिप भाडे” म्हणून 1,67,74,647 रुपये आकारण्यात आल्याचे दिसून आले. याशिवाय 5,99,09189 रुपये (वेटिंग चार्ज) प्रतिक्षा शुल्क म्हणून दाखवत होते. प्रमोशन कॉस्ट म्हणून 75 रुपये वजा करण्यात आले होते.
ही पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल होताच, उबर इंडिया कस्टमर सपोर्टच्या अधिकृत एक्स पेजने तत्काळ माफी मागितली आणि दावा केला की ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत. यामुळे कंपनीने नंतर स्पष्टीकरणही दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.