Kanhaiyalal Murder Case esakal
देश

Kanhaiyalal Murder Case : कन्हैया हत्याकांडाचं 'पाक कनेक्शन'; NIA च्या आरोपपत्रात कराचीतील दोघांची नावं!

'कन्हैयालालची हत्या ही पूर्णपणे दहशतवादी घटना होती, जी देशभरात भीती पसरवण्यासाठी करण्यात आली.'

सकाळ डिजिटल टीम

'कन्हैयालालची हत्या ही पूर्णपणे दहशतवादी घटना होती, जी देशभरात भीती पसरवण्यासाठी करण्यात आली.'

उदयपूर : देशात गाजलेल्या कन्हैयालाल हत्या प्रकरणात (Kanhaiyalal Murder Case) पाकिस्तानी कनेक्शन (Pakistan Connection) असल्याचं सिद्ध झालंय. एनआयएनं (NIA) सादर केलेल्या आरोपपत्रात पाकिस्तानातील दोघांची आरोपी म्हणून नावं आहेत.

या प्रकरणात मुख्य आरोपी रियाज मोहम्मद आणि गौस मोहम्मद यांच्यासह 11 आरोपींची नावं आहेत. जयपूरच्या विशेष न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात एनआयएनं सांगितलं की, 'कन्हैयालालची हत्या ही पूर्णपणे दहशतवादी (Terrorist) घटना होती, जी देशभरात भीती पसरवण्यासाठी करण्यात आली.'

एनआयएनं उदयपूरमधील नऊ आरोपींव्यतिरिक्त पाकिस्तानातील कराची शहरात राहणाऱ्या दोन लोकांनाही आरोपी बनवलंय. कन्हैयालालच्या हत्येप्रकरणी पाकिस्तानी आरोपींची भूमिका काय होती, हे सध्या तरी स्पष्ट झालेलं नाही. मात्र, हे आरोपी सोशल मीडियावरील अनेक ग्रुपमध्ये अॅक्टिव्ह होते आणि भडकाऊ संदेश पाठवत असल्याचं स्पष्ट झालंय. कन्हैयालाल हत्याकांडातील अन्य नऊ आरोपीही याच गटात सामील होते.

माहितीनुसार, एनआयएनं जयपूरच्या विशेष न्यायालयात भारतीय दंड संहितेच्या कलम 120B, 449, 302, 307, 324, 153(A), 153(B), 295(A) 16, 18 अंतर्गत UA (P) कायदा आणि 20 अंतर्गत आरोपपत्र सादर केलंय. यासोबतच शस्त्रास्त्र कायद्याचं कलम 4/25 (1B) देखील लागू करण्यात आलंय.

एनआयएनं दाखल केलेल्या कन्हैयालाल खून खटल्यातील आरोपींपैकी मुख्य आरोपी मोहम्मद रियाज, मोहसीन खान, मोहम्मद रफिक, वसीम अली, एजाज मोहम्मद, मोहम्मद जावेद, मोहम्मद मोहरम आणि मुस्लीम खान उर्फ ​​रझा, शेर मोहम्मद यांच्याशिवाय कराचीतील रहिवाशी सलमान आणि अबू इब्राहिम यांनाही आरोपपत्रात आरोपी करण्यात आलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT