udaipur killer of tailor kanhaiya lal paid extra 5000 for 2611 bike number  
देश

उदयपूर हत्याकांड अन् २६/११ चं कनेक्शन काय? वाचा काय आहे प्रकरण

सकाळ डिजिटल टीम

उदयपूर : काही दिवसांपूर्वी घडलेले देशाला हादरवून सोडणाऱ्या उदयपूर हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील गुन्हेगारांनी त्यांच्या दुचाकीसाठी '2611' ही नंबर प्लेट घेण्यासाठी 5000 रुपये जास्तीचे दिले होते. या प्रकरणात आरोपीचा दहशतवादी गटांशी संबंध असल्याचे संकेत मिळाल्याने, पोलीस हा गाडीचा नंबर मुंबईत झालेला भीषण दहशतवादी हल्ला झाला त्या तारखेशी जोडून पाहात आहेत.

या आरोपीने ज्या गाडीसाठी हा नंबर घेतला ती ही गाडी तीच आहे, ज्यावर गोस मोहम्मद आणि रियाझ अख्तारी हे दोन मारेकरी कन्हैया लालचा गळा चिरून फरार झाले होते. RJ 27 AS 2611 क्रमांक असलेली ही दुचाकी सध्या उदयपूरमधील धन मंडी पोलिस ठाण्यात पडून आहे.

दरम्यान पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे की, रियाझ या गुन्हेगारांपैकी एकाने मुद्दाम '2611' नंबर मागितला आणि या नंबर प्लेटसाठी त्याने 5,000 रुपये जास्तीचे मोजले. पोलिसांना या दुचाकी क्रमांकाच्या माध्यमातून घटनेच्या खऱ्या कारणांचा तळ गाठायचा प्रयत्न करत आहेत. एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार पोलिस सुत्रांनी सांगितले की, रियाझच्या पासपोर्टवरून तो 2014 मध्ये नेपाळला गेल्याचे देखील समोर आले आहे.

उदयपूर हत्याकांडाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओनुसार, दोन्ही आरोपी दुपारी धनमंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कन्हैया लाल या टेलरच्या दुकानात पोहोचले. एकान स्वतःला ग्राहक असल्याचे भासवले त्यानंतर टेलर कन्हैयालालने त्याची मापे घ्यायला सुरुवात केली. यावेळी त्याने टेलरवर हल्ला केला, तर अन्य आरोपीने मोबाईलवरून घटनेचा व्हिडिओ बनवला.

व्हिडिओनुसार, टेलर माप घेत असताना रियाझने अचानक त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला, त्यात तो जागीच ठार झाला. घटनेनंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले आणि नंतर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी गुन्ह्याची कबुली देखील दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT