Opposition Meeting 
देश

Opposition Meeting: "मी स्वत:ला विरोधक मानत नाही, पण...", विरोधकांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंचा इशारा

Sandip Kapde

Opposition Meeting in Patna : लोकसभा निवडणुकीत 2024 मध्ये भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात 17 भाजप विरोधी पक्षांनी पाटणा येथे जोरदार मोर्चेबांधणी केली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक सुमारे साडेचार तास चालली.

नितीश यांना महाआघाडीचे समन्वयक बनवण्याबाबत बैठकीत चर्चा झाली आहे, मात्र पुढील बैठकीत निर्णय होणार आहे. पुढील बैठक 10 ते 12 जुलै दरम्यान शिमल्यात होणार आहे. आजच्या बैठकीनंतर सर्व विरोधी नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली. (Uddhav Thackeray News)

उद्धव ठाकरे म्हणाले, संपूर्ण देशातील पक्षाचे प्रमुख नेते इथ आले आहे. काश्मिरपासून कन्याकुमारी पर्यंत सर्व एकत्र आले आहे. सर्व वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे स्वाभाविक आहे सर्वांची विचारधारा देखील वेगळी आहे. मतभिन्नता देखील असेल. मात्र देश एक आहे. देशाला वाचवण्यासाठी, देशाची अखंडता वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. जो देशाच्या लोकशाहीवर आघात करेल त्याचा सर्व मिळून सामना करु.

नेहमी म्हणतात विपक्षांची एकता होणार की नाही. मी स्वताला विरोधक मानत नाही. जो देशद्रोही आहे, ज्याला देशात हुकूमशाही आणायची आहे त्याच्या विरोधात आम्ही राहू. आता सुरूवात झाली आहे. जेव्हा सुरूवात चांगली होते तेव्हा सर्व गोष्टी चांगल्या होत्यात. (Patna Opposition Meeting News Updates)

पाटणा येथे झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, सर्व पक्षांनी एकत्र लढण्याचे मान्य केले आहे. पुढील बैठकीत पुढील बाबींवर निर्णय घेतला जाईल. शिमल्यात युतीचे नाव, समन्वयक आणि जागावाटपाचा फॉर्म्युला यावर चर्चा होणार आहे.

सुरुवातीलाच ममता बॅनर्जी यांनी सर्वांनी त्याग करावा लागेल, तरच विरोधक एकत्र येऊ शकतील, अशी महत्त्वाकांक्षा सोडून नेत्यांशी बोलून बैठकीचा सूर लावला.

या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांचा दिल्ली अध्यादेशावर AAP ला पाठिंबा दर्शवला, तर नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला यांनी केजरीवाल यांना कलम 370 बद्दल AAP ची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. केजरीवाल यांनी आपल्या भाषणात दिल्ली सरकारच्या अधिकाराबाबत केंद्राच्या अध्यादेशावर चर्चा केली आणि राज्यसभेत सर्वांचा पाठिंबा मागितला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mallikarjun Kharge Video : प्रियंका गांधी अर्ज दाखल करताना खर्गे दाराबाहेर उभे? दलितांचा अपमान झाल्याचा भाजपचा आरोप

Samsung Galaxy Smart Ring : सॅमसंग गॅलेक्सी रिंग झाली लाँच; फॅशन-तंत्रज्ञानाचा अनोखा संगम,किंमत अन् फीचर्स पाहा

Latest Maharashtra News Updates : Canada Politics Live: सुप्रिया सुळेंनी केलं हर्षवर्धन पाटलांचं औक्षण

Kalyan Gramin Assembly Constituency: मनसेचे राजू पाटील वाचवणार का आपली जागा? की उद्धव ठाकरे देणार धक्का?

Kolhapur Politics : कोल्हापूर शहराचे पहिले आमदार कोण? 'या' चिन्हावर मिळवला होता विजय, अनेक संकटांवर केली होती मात

SCROLL FOR NEXT