Udhayanidhi Controversial Remark on Sanatana Dharma
नवी दिल्ली- उदयनिधी स्टॅलिन यांचे सनातन धर्मावरील वक्तव्य अतिशय दुर्दैवी असून त्यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते डॉ. करन सिंग यांनी दिली आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माचा फक्त विरोधत नवे तर याला नष्ट केले पाहिजे, असं वक्तव्य एका कार्यक्रमात केले होते. यावरुन बराच वाद सुरु झाला आहे.
काँग्रेसकडून उदयनिधी यांच्या वक्तव्यानंतर बचावात्मक पवित्रा घेण्यात आला आहे. त्यातच काँग्रेस नेते करन सिंग यांनी उघडपणे उदयनिधी यांचा निषेध केला आहे. त्यांनी यासंदर्भात पत्रक जारी केले आहे. देशातील कोट्यवधी लोकांवर कमी जास्त प्रमाणात सनातन धर्माचा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांनी केलेलं वक्तव्य अतिशय दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले.
जगातील सर्वात उत्कृष्ट असे मंदिर तमिळनाडूच्या तंजावरमध्ये, सुचिंद्रम, त्रिरुवनमलाई, चिंदबरम, मदुराई, श्रीरंगम, रामेश्वर येथे आहेत. एका जबाबदार नेत्याने असं वक्तव्य करणे स्वीकारण्यासारखं नाही. तमिळ संस्कृतीचा मला आत्यंतिक आदर आहे. पण, थिरु उदयनिधी यांनी केलेल्या वक्तव्याचा मी निषेध करतो , असं काँग्रेस नेते डॉ. करन सिंग म्हणाले.
उदयनिधी यांच्या वक्तव्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपकडून उदयनिधी स्टॅलिन यांच्यासह विरोधकांना लक्ष्य करण्यात आलंय. काँग्रेससह विरोधकांनी सनातन धर्माचा अपमान केला आहे. विरोधकांना देशातून सनातन धर्म संपवायचा आहे, अशी टीका भाजपने केली. भाजपच्या अनेक नेत्यांनी सोशल मीडियावरुन तीव्र नाराजी व्यक्त केलीये.
सनातन धर्माला विरोध नाही तर त्याला नष्टच करायला हवे. सनातन धर्म कोरोना, डेंग्यु, मलेरिया सारखा आहे आणि त्याला संपवायलाच हवे, असं उदयनिधी म्हणाले होते. अमित शाह यांनी या वक्तव्याचा समाचार घेतला होता. डीएमके प्रमुख आणि एमके स्टॅलिन यांचा मंत्री असलेला मुलगा आणि इंडिया आघाडी हिंदूत्वाचा द्वेष करतात, त्यांनी आपल्या संस्कृतीवर घाला घातला आहे, अशी टीका त्यांनी केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.