Paramhans Acharya 
देश

Sanatana Remark: "उदयनिधींचं शीर कापणाऱ्याला १० कोटींचं बक्षीस"; अयोध्येतील पुजाऱ्याची घोषणा

तामिळनाडूचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर कठोर शब्दांत टीका केली होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : सनातन धर्माबद्दल वादग्रस्त विधान केलेले तामिळनाडूचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांचं डोक उडवणाऱ्याला १० कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा अयोध्येतील पुजारी परमहंस आचार्य यांनी केली. त्यांच्या या विधानामुळं आता हा वाद आणखी पेटणार असल्याचं चित्र आहे. (Udhayanidhi Sanatana Remark 10 crores reward for beheaded announcement of Parmhans Acharya)

१० कोटींचं बक्षीस

अयोध्येतील तपस्वी छावनी मंदिराचे मुख्य पुजारी परमहंस आचार्य म्हणाले, "स्टॅलिन यांचं शीर कापून माझ्याकडं आणणाऱ्याला मी १० कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा करतो. जर कोणामध्ये स्टॅलिन यांना मारण्याची हिंमत नसेल तर मी स्वतःचं जगातील कुठल्याही कोपऱ्यातून त्यांना शोधून काढून मारुन टाकेन" असं वादग्रस्त विधानही त्यांनी केलं आहे. (Latest Marathi News)

उदयनिधी स्टॅलिन काय म्हणाले?

शनिवारी सनातन निर्मुलन कार्यक्रमात बोलताना उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, "सनातन धर्म हा सामाजिक न्यायाच्याविरोधात आहे. त्यामुळं काही गोष्टींना विरोध केला जाऊ शकत नाही तर तो नष्टच केला पाहिजे. आपण डेंग्यू, मलेरिया, मच्छर किंवा कोरोनाला विरोध करु शकत नाही या गोष्टी संपवाव्याच लागतात" (Marathi Tajya Batmya)

आचार्यांची यापूर्वीही वादग्रस्त विधान

परमहंस आचार्यांनी यापूर्वी देखील रामचरितमानसवर टीका करणाऱ्या समाजवादी पार्टीचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांचं शीर कापणाऱ्याला तसेच पठाण सिनेमात दिपिका पादुकोननं परिधान केलेली बिकीनी भगव्या रंगात दाखवल्याबद्दल अभिनेता शाहरुख खानला जिवंत जाळणाऱ्याला रोख रक्कम देण्याची घोषणा केली होती.

सनातन धर्माची सुरुवात नाही आणि अंतही नाही. सनातन धर्म कधीही नष्ट झाला नाही आणि होणारही नाही, असंही या आचार्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT