udhayanidhi stalin sanatana row in letter to cji chandrachud eminent citizens demand action against udhayanidhi stalin sakal
देश

Udhayanidhi Stalin : उदयनिधी स्टॅलिन यांचे वक्तव्य द्वेषमूलक; देशभरातील मान्यवरांचे सरन्यायाधीशांना पत्र

सरन्यायाधीशांना उद्देशून लिहिलेल्या या पत्रावर दिल्लीचे माजी न्यायाधीश एस.एन.धिंग्रा यांचीही स्वाक्षरी समावेश आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : तमिळनाडूतील सत्ताधारी ‘द्रमुक’चे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्याची गंभीर दखल घेताना देशभरातील आघाडीच्या २६० लोकांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना पत्र लिहिले असून त्यात त्यांनी उदयनिधी यांच्या भाषणाची न्यायालयाने दखल घ्यावी, अशी विनंती केली आहे.

उदयनिधी यांचे वक्तव्य द्वेषमूलक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सरन्यायाधीशांना उद्देशून लिहिलेल्या या पत्रावर दिल्लीचे माजी न्यायाधीश एस.एन.धिंग्रा यांचीही स्वाक्षरी समावेश आहे. उदयनिधी हे केवळ द्वेषमूलक भाषण करून थांबले नाही तर त्यांनी माफी मागायला देखील नकार दिला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

या पत्रावर एकूण २६० लोकांच्या स्वाक्षऱ्या असून त्यामध्ये १४ निवृत्त न्यायाधीश, १३० माजी नोकरशहा आणि ११८ माजी लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ‘उदयनिधी यांच्या वक्तव्याची आम्हाला चिंता वाटते, त्यांचे विधान हे देशातील बहुसंख्य लोकांविरोधात निर्विवादपणे द्वेषमूलक स्वरूपाचे आहे.

राज्यघटनेने जे धर्मनिरपेक्षतेचे मूल्य घालून दिले आहे, तिच्या मुळावरच हा घाला घालण्याचा प्रकार आहे,’ असा दावाही या पत्रात करण्यात आला आहे. देशाच्या धर्मनिरपेक्ष चारित्र्याचे संरक्षण करायचे असेल तर उदयनिधी यांच्यावर तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे, अशी मागणी देखील या पत्रातून करण्यात आली आहे. प्रशासकीय पातळीवरून याबाबतच्या कारवाईला विलंब होत असेल तर तो न्यायालयाचाच अवमान ठरेल, असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

हिटलरशी तुलना

भाजपने देखील याच मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘उदयनिधी यांचे वक्तव्य हे द्वेषमूलक स्वरूपाचे असून सनातन धर्माचे पालन करणाऱ्या ८० टक्के लोकांचा वंशच्छेद करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. काँग्रेस आणि विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी स्टॅलिन यांच्या वक्तव्याचे समर्थन करते का?’ हे त्यांनी स्पष्ट करावे, असे आव्हान भाजपने दिले आहे. भाजपने उदयनिधी यांची हिटलरशी तुलना केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दक्षिण कराडमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT