UGC NET esakal
देश

UGC NET: 25 ते 27 जूनपर्यंत होणारी CSIR परीक्षा स्थगित; NTAने सांगितलं कारण...

संतोष कानडे

नवी दिल्लीः राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएने संयुक्त सीएसआयआर-यूजीसी-नेट परीक्षा रद्द करण्याची घोषणा शुक्रवारी केली. ही परीक्षा २५ जून ते २७ जून दरम्यान होणार होती. लॉजिस्टिक कारणांमुळे परीक्षा स्थगित करण्यात आल्याचं NTA कडून सांगण्यात आलं. नवीन तारीख लवकच वेबसाईटवर घोषित केली जाणार आहे.

एनडीएकडून काढण्यात आलेल्या सर्क्युलरमध्ये म्हटलंय की, २५ ते २७ जून २०२४च्या दरम्यान होणारी नियोजित संयुक्त सीएसआयआर नेट परीक्षा अपरिहार्य परिस्थिती आणि लॉजिस्टिक कारणांमुळे स्थगित करण्यात आलेली आहे. परीक्षेची सुधारित तारीख लवकरच अधिकृत वेबसाईट csirnet.nta.ac.in यावर घोषित केली जाईल.

दरम्यान, १९ जून रोजी केंद्र सरकारने परीक्षेवर प्रश्न उपस्थित करत १८ जून रोजी झालेली यूजीसी-नेट परीक्षा रद्द केली होती. बिहारसारख्या राज्यांमध्ये प्रश्नपत्रिका लीक होणं आणि नीट परीक्षेमधील गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे नेट परीक्षा रद्द करण्यात आलेली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT