दिल्ली: उद्योगात आणि व्यावसाय क्षेत्रातील तज्ञांना शिक्षण क्षेत्राशी जोडण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांदरम्यान, केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) केंद्रीय विद्यापीठांमध्ये शिकवण्यासाठी असलेली पीएचडीची अट काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी काही विशेष पदं तयार करण्यात येणार आहेत. त्यानुसार प्रोफेसर ऑफ प्रॅक्टीस अँड असोशिएट आणि असोशिएट प्रोफेसर ऑफ प्रॅक्टीस ही पदं तयार करण्यात येणार आहेत.
उद्योग क्षेत्रातील तज्ञ आणि व्यावसायिकांना केंद्रीय विद्यापीठांमध्ये शिकवण्याची संधी देण्याचा युजीसीचा हेतू आहे. यापैकी बहुतेक व्यावसायिक असे आहेत ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील भरपूर ज्ञान आहे परंतु शिकवण्यासाठी पीएचडी पदवी नाही. या संदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम जगदेश कुमार म्हणतात की, अनेक असे तज्ञ आहेत जे शिकवण्यास इच्छुक आहेत. तळागाळात काम करण्याचा अनुभव असणारे अनेक लोक आहेत. त्यामध्ये एखादा उत्तम नर्तक किंवा एखादा चांगला गायकही असू शकतो. सध्याच्या नियमांनुसार या सर्वांची नियुक्ती करता येत नाही. हे सर्व हेतू लक्षात घेत विशेष पदं निर्माण केली जात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.