uma Bharti 
देश

Uma Bharti : शिवराज सरकारच्या नव्या दारू धोरणाच्या प्रतीक्षेत उमा भारती; मंदिरातच मांडला ठिय्या

सकाळ डिजिटल टीम

भोपाळ : मध्य प्रदेश सरकारच्या प्रस्तावित नवीन मद्य धोरणाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी ३१ जानेवारीपर्यंत येथील एका मद्यदुकानासमोरील मंदिरात ठिय्या मांडला. उमा भारती यांनी नियंत्रित मद्य वितरण व्यवस्थेच्या धोरणाचा अवलंब करण्याची मागणी केली आहे. नियंत्रित मद्य वितरण प्रणाली लागू करण्याची त्यांची मागणी आहे. (Uma Bharti news in Marathi)

भोपाळच्या अयोध्या नगरमधील मंदिरात बोलताना उमा भारती म्हणाल्या की, "मी कधीही दारूवर पूर्णपणे बंदी घालावी असं म्हटलं नाही. मात्र ३१ जानेवारी रोजी राज्य सरकारचे नवे मद्यधोरण जाहीर होण्याची वाट पाहत आहे. पुढील तीन दिवस याच मंदिरात बसून ते ऐकणार आहे.

"पूर्ण दारूबंदी असावी असं मी कधीच म्हटलं नाही. जर पूर्णपणे दारूबंदी करणं माझ्या नियंत्रणात असते तर मी संपूर्ण दारूबंदी लागू केली असती. मात्र मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे ३१ जानेवारीला नव्या मद्यधोरणाच्या निर्णयाची वाट पाहणार आहे, असंही उमा भारती यांनी म्हटलं.

आपल्या या भूमिकेचा काँग्रेसला फायदा होऊ नये, अशी माझी इच्छा असल्याचं उमा भारती म्हणाल्या. भाजपप्रणित राज्य सरकारने नियंत्रित मद्यवितरण व्यवस्था राबविली तर २००३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच यंदाही नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप विक्रमी विजयाची पुनरावृत्ती करेल, असंही त्या म्हणाल्या.

दोन दिवसांपूर्वी 2003 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जबलपूरच्या गॅरिसन मैदानावर आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री चौहान म्हणाले होते की, आम्ही नवीन दारू धोरण आणणार आहोत. नशेच्या सवयीला परावृत्त करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील १३१०९ मतांची आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT