rajyasabha sakal
देश

Shivraj Chouhan : ‘एमएसपी’वरून विरोधकांचा गदारोळ;राज्यसभेत केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे गोंधळातच उत्तर

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : शेतमालांना किमान हमी भाव (एमएसपी) देण्यासाठी कायदेशीर तरतूद करावी, या मागणीसाठी विरोधकांनी आज राज्यसभेत गोंधळ घातला. या गोंधळातच केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती प्रश्नोत्तराच्या तासात उत्तरादाखल दिली.

अर्थसंकल्पी अधिवेशन

समाजवादी पक्षाचे रामजीलाल सुमन यांनी ‘एमएसपी’बाबत मूळ प्रश्न विचारला होता. यावेळी त्यांनी एमएसपी ठरविण्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समितीचा अहवाल आला आहे काय, अशी विचारणा केली. यावर केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या समितीचा अहवाल प्राप्त झालेला नसून समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सरकार त्यावर निर्णय घेईल, असे उत्तर दिले. यानंतर खासदार रामजीलाल सुमन यांनी एमएसपीला घटनात्मक दर्जा मिळणार की, असा थेट प्रश्न विचारला. या प्रश्नाला काँग्रेसचे रणदीप सिंग सुरजेवाला, जयराम रमेश, रजनी पाटील, फुलोदेवी नेताम, दिग्विजय सिंह यांनी समर्थन दिले. यावर केंद्रीय मंत्र्यांनी उडवाउडवीचे उत्तर न देता थेट उत्तर द्यावे, असा आग्रह धरला. याला तृणमूल काँग्रेस, द्रमुक, आप, बीजेडीच्या खासदारांनी पाठिंबा दिला.

विरोधकांकडून घोषणाबाजी

केंद्रीय मंत्री चौहान एमएसपीला घटनात्मक दर्जा देण्याबद्दल कोणतेही आश्वासन देण्यास तयार नसल्याने काँग्रेसच्या खासदारांनी ‘एमएसपी का कानून लाओ’, ‘किसान विरोधी मोदी सरकार व गरीब विरोधी मोदी सरकार’ अशा घोषणा देण्यास सुरूवात केली.

सभापती जगदीप धनकड विरोधकांना शांतता राखण्याचे वारंवार आवाहन करीत होते. काँग्रेसचे रणदीप सिंह सुरजेवाला वारंवार आसन सोडून घोषणा देत असल्याने सभापतींनी त्यांनी एकवेळ सभागृहाच्या बाहेर जाण्याचे आदेश दिले तरी विरोधक शांत झाले नाही. उलट एमएसपीचा कायदा केव्हा करता, याचे उत्तर मंत्र्यांनी द्यावे, यासाठी सर्व विरोधक आग्रही होते. या गोंधळातच केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षात शेतकऱ्यांसाठी केलेल्या निर्णयांची उजळणी करीत होते. यूपीए सरकारने शेतमालांना दिलेल्या भावापेक्षा गेल्या वर्षात मोदी सरकारच्या काळात शेतमालांना अधिक भाव मिळाला आहे. विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केवळ राजकारण करीत आहे, असा आरोप केला.

विरोधक शेतकरी विरोधी: सभापती

सभापती धनकड यांनी सुद्धा विरोधकांना शेतकरी विरोधी असल्याचा आरोप केला. केंद्रीय मंत्री शेतकऱ्यांच्या योजनांबाबत सांगत असताना विरोधक गोंधळ घालत आहे. आपण शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. आपण यामुद्यावरून विरोधक वचपा काढत असल्याचे आरोप सभापती धनकड यांनी केला. केंद्र सरकारने २३ शेतमालांना एमएसपी जाहीर केली आहे. या एमएसपीवर शेतकऱ्यांचे धान्य खरेदीसाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. शेतकर्यांना शेतकरी सन्मान निधी अंतर्गत निधी दिला जात आहे. शेतकऱ्यांची १ लाख ६७ हजार कोटी रुपयांची खतांवर अनुदान दिले आहे. या सर्व योजनांमधून शेतकऱ्यांना फायदा दिला जात आहे. यापुढे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणार असल्याचे आश्वासन चौहान यांनी दिले. यावेळी काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांचा घोषणा देणे सुरूच राहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT