'आमच्या सरकारनं अग्निपथ योजना आणलीय. काही लोक यामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत.'
देशभरात अग्निपथ योजनेवरुन (Agneepath Scheme Violence) सुरू असलेल्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एक महत्त्वपूर्ण विधान केलंय.
राजनाथ सिंह म्हणाले, 'आमच्या सरकारनं (Central Government) अग्निपथ योजना (Agneepath Scheme) आणलीय. काही लोक यामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत अथवा कदाचित नवीन योजना आहे, त्यामुळं काही गैरसमजही आहेत. ही योजना बनवण्यापूर्वी आम्ही खूप चर्चा केलीय. दीड वर्षापासून त्याची तयारी करण्यात आलीय. मात्र, देशातील नागरिकांची देशाप्रती बांधिलकी (Indian Army) असावी, अशी आमची इच्छा आहे.'
ते पुढं म्हणाले, ही चार वर्षांची सेवा आहे. चार वर्षे संपल्यानंतर, अग्निवीरांच्या हातात 11 लाख 71 हजार रुपये असणार आहेत. शिवाय, हायस्कूलनंतर प्रवेश घेतल्यास त्यांना इंटर प्रमाणपत्र मिळेल, तर इंटरचे शिक्षण घेतल्यानंतर प्रवेश घेतल्यास त्यांना डिप्लोमा प्रमाणपत्र मिळणार आहे. अग्निपथ योजनेमुळं संरक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल होणार आहेत. मात्र, काही लोक अग्निपथच्या विरोधात गैरसमज पसरवत आहेत. अग्निवीरांना रोजगाराच्या नवीन संधी मिळणार आहेत. अनेक राज्य सरकारांनी अग्निशमन दलाला रोजगार देण्याचं मान्य केलंय. तसेच सार्वजनिक क्षेत्रानं अग्निवीरांना रोजगार देण्याचं आश्वासन दिल्याचं राजनाथ सिंहांनी यावेळी स्पष्ट केलं.
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अग्निपथ योजना जाहीर केल्यानंतर या योजनेला देशभरातून विरोध होऊ लागलाय. राजनाथ सिंह यांच्या घोषणेनंतर बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा अशा राज्यांमधून या योजनेला विरोध दर्शविण्यात आला. देशात अनेक ठिकाणी या योजनेविरोधात तरुणांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण देखील लागलं आहे. अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळही करण्यात आलीय. तसेच छपरा इथं विद्यार्थ्यांनी रेल्वेला आग लावल्याची गंभीर घटना देखील घडलीय. सरकारनं ही योजना मागे घ्यावी, अशी आंदोलक विद्यार्थ्यांनी मागणी केलीय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.