Kanwar Yatra 2022 esakal
देश

कावड यात्रेदरम्यान कट्टरपंथीयांकडून धोका; गृहमंत्रालयानं गुप्तचर यंत्रणेला केलं 'सतर्क'

यंदा कावड यात्रेदरम्यान कट्टरपंथींकडून धोका असून केंद्रीय गृहमंत्रालयानं देशातील गुप्तचर यंत्रणेला ‘अलर्ट’ केलंय.

सकाळ डिजिटल टीम

यंदा कावड यात्रेदरम्यान कट्टरपंथींकडून धोका असून केंद्रीय गृहमंत्रालयानं देशातील गुप्तचर यंत्रणेला ‘अलर्ट’ केलंय.

Kanwar Yatra 2022 : यंदा कावड यात्रेदरम्यान कट्टरपंथीयांकडून धोका असून केंद्रीय गृहमंत्रालयानं (Union Ministry of Home Affairs) देशातील गुप्तचर यंत्रणेला ‘अलर्ट’ केलंय. कावड यात्रा विस्कळीत करण्यासाठी विध्वंसक शक्तींकडून कोणते षडयंत्र रचले जाऊ शकते, हे देखील सूचित केलंय. त्यामुळं राज्यांच्या गुप्तचर यंत्रणेनं सतर्क राहण्याबरोबरच राज्य पोलिसांनाही सतर्क केलंय.

यादरम्यान, केंद्रीय गुप्तचर यंत्रणेनं रेल्वेवरील धोक्याचा इशाराही दिलाय. केंद्रीय गृहमंत्रालयानं स्पष्टपणे सांगितलं की, यंदा कावड यात्रेदरम्यान कट्टरपंथीय घटकांपासून होणाऱ्या संभाव्य धोक्याबाबत सर्वाधिक सतर्क राहावं लागेल. केंद्रीय गुप्तचर विभागाकडून (Central Intelligence Agency) मिळालेल्या माहितीनंतर केंद्रीय गृह मंत्रालयानं ही सूचना जारी केलीय.

सूचना प्राप्त होताच राज्यांनी त्यांच्या पोलिसांना आणि स्थानिक माहिती यंत्रणेलाही सतर्क केलंय. सतर्क राहण्यासोबतच केंद्रीय गृह मंत्रालयानं खबरदारीचा उपाय म्हणून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी अतिरिक्त निमलष्करी सुरक्षा दल तैनात करण्याचा सल्ला दिलाय. हे सुरक्षा दल स्थानिक पोलिसांच्या मदतीसाठी असेल. गृह मंत्रालयानं ही मार्गदर्शक सूचना सर्व राज्यांना पाठवलीय. मात्र, ज्या राज्यांमध्ये कावड यात्रेची प्रथा अधिक आहे, त्या राज्यांना विशेष खबरदारी देण्यात आलीय. यात उत्तर प्रदेश, झारखंड, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशचा समावेश आहे. विशेष म्हणजे, गृहमंत्रालयानं सर्व राज्यांच्या रेल्वे सुरक्षा दलांनाही सतर्क केलंय. कारण, देशाच्या कोणत्याही राज्याच्या सीमेवर रेल्वेच्या सुरक्षेची पहिली आणि थेट जबाबदारी रेल्वे पोलिस दलाची असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: उमरगा विधानसभा मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार?

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT