C. R. Patil sakal
देश

C. R. Patil : मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन योजना दोन वर्षांत पूर्ण ; केंद्रीय जलशक्ती मंत्री पाटील यांचे आश्वासन

सकाळ वृत्तसेवा

अर्थसंकल्पी अधिवेशन

नवी दिल्ली : पुण्यातील मुळा-मुठा नदी पुनर्जीवन व स्वच्छता प्रकल्प येत्या २०२६ पर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तरात तासात दिले. भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुण्यातील भूजल पातळीत होणारी घट व बेकायदा कूपनलिकांद्वारे पाण्याच्या होणाऱ्या उपशासंदर्भात प्रश्न विचारला होता. यासाठी केंद्र सरकारने काही धोरण ठरविले आहे काय, असेही खासदार कुलकर्णी यांनी विचारले होते. यावर उत्तर देताना केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील म्हणाले, भूजल पातळी व कूपनलिकांचा विषय राज्य सरकारचा असला तरी भूजल पातळीमध्ये वाढ करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहे. या सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत.

पुण्यातील मुळा-मुठा नदी प्रकल्पाला जपानमधून निधी मिळाला आहे. यावर ९९० कोटी रुपये खर्च होणार आहे. यापैकी ८५ टक्के खर्च केंद्र सरकार तर उर्वरित खर्च राज्य सरकारला करावयाचा आहे. या योजनेची सुरवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ मार्च २०२२ मध्ये केली होती. या योजनेचे ४० टक्के काम पूर्ण झाले असून आतापर्यंत ४१५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. यात ११ जलशुद्धीकरण केंद्रे उभारण्यात येणार आहे. यातून ९६ दशलक्ष लिटर पाण्याचे शुद्धीकरण होणार तसेच ५३ किलोमीटर लांबीच्या मलनिःसारण वाहिन्या टाकण्यात येणार आहे. हा प्रकल्प २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी सांगितले.

उत्तर देण्याचे सभापतींचे निर्देश

सपच्या खासदार जया बच्चन यांनी यावेळी भूजल प्रदूषणाबद्दल पुरवणी प्रश्न विचारला होता. यापूर्वी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले होते. परंतु अद्यापही मंत्र्यांकडून उत्तर आलेले नाही. मंत्र्यांनी खासदारांना किती दिवसात उत्तर द्यावयाचे, या संदर्भात काही नियम आहे काय, असा सवाल खासदार जया बच्चन यांनी केला. याची तत्काळ दखल सभापती जगदीप धनकड यांनी घेतली व खासदार जया बच्चन यांच्या प्रश्नांना १५ दिवसात लेखी उत्तर द्यावे, असे निर्देश केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांना दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Disqualification Case: शिवसेना- राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी अखेर मिळाला मुहूर्त; या तारखेला होणार सुनावणी

Latest Marathi News Updates : स्थानिकांनी घातला धारावी पोलीस ठाण्याला घेराव

Cha.Sambhajinagar: मराठवाड्यात काँग्रेस असणार मोठा भाऊ? या जागांवर केला दावा

Tirumala Tirupati Laddu: 'तिरुपती'च्या लाडूमध्ये आढळले जनावराची चरबी अन् माशांचं तेल; 'या' पद्धतीने ओळखा तूपाची शुद्धता

Bigg Boss Marathi 5 Voting Trends: सुरजला जान्हवीने दिली टक्कर तर 'या सदस्याला मिळालेत सगळ्यात कमी वोट्स; कोण होणार घराबाहेर?

SCROLL FOR NEXT