Union Minister Amit Shah on Sunday attacked Bihar Nitish Kumar government and alleged that the caste survey in the state deliberately showed an inflated Muslim and Yadav population knp94 
देश

Bihar Caste Survey: बिहारमधील जातीनिहाय जनगणनेत मुस्लिम, यादव...; अमित शाहांचा गंभीर आरोप

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच बिहारमध्ये झालेल्या जातीनिहाय जनगणनेबाबत शंका उपस्थित केली आहे. जनगणनेमध्ये तुष्टीकरणासाठी मुस्लिम आणि यादव समूदायाची संख्या वाढवून दाखवण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील एका सभेत बोलताना त्यांनी हा दावा केलाय.

नितीश कुमार जेव्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए)चा घटकपक्ष होते त्यावेळी जातनिहाय जनगणना घेण्याचा निर्णय घेतला होता, अस शाह यावेळी म्हणाले. इंडिया आघाडीचा केवळ एक अजेंडा आहे तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करणे, अशी टीकाही त्यांनी केली. राष्ट्रीय जनता दल RJD आणि संयुक्त जनता दल JD(U) हे दोन्ही इंडिया आघाडीचे सहयोगी पक्ष आहेत. (Muslims Yadav population deliberately inflated in Bihar caste survey said Amit Shah)

नितीश कुमार यांनी पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहू नये. इंडिया आघाडीने त्यांना संयोजक सुद्धा केलं नाही. बिहारमध्ये सध्या गुंडाराज सुरु आहे आणि त्यासाठी नितीश कुमार जबाबदार आहेत, असं म्हणत शाह यांनी टीका केली. काही जणांना पंतप्रधान व्हायचंय तर काहींना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे, असं म्हणत त्यांनी लालू यादव यांच्यावर टीका केली.

बिहारमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत भाजप ४० जागा जिंकेल असा दावा अमित शाह यांनी केलाय. शाह यांनी लालू यादव यांच्यावर टीका करता म्हटलं की, आरजेडी आणि जेडीयू यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्यावरुन विरोध केला होता. कलम ३७० हटवल्यानंतर रक्ताची नदी वाहेल असं लालू यादव म्हणाले होते. पण, कोणाला एखादा खडा देखील मारण्याची हिंमत झाली नाही.

दरम्यान, बिहारमध्ये जातीय जनगणना करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरात जातनिहाय जनगणना करण्याची मागणी होऊ लागली आहे. राजस्थान आणि आंध्र प्रदेश सरकारने राज्यात जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी सत्तेत आल्यास जनगणना करणार असल्याचं आश्वासन दिलंय. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT