Piyush Goyal On Sharad Pawar 
देश

Piyush Goyal On Sharad Pawar: 'कुजलेली मानसिकता'; पियुष गोयल यांची शरद पवारांवर कडवट टीका

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर कडवट टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी इस्राइल-पॅलेस्टाईन संघर्षावर भाष्य केलं होत. यावरुन गोयल यांनी पलटवार केला आहे. इस्राइलमधील दहशतवादी हल्ल्याबाबत भारताने घेतलेल्या भूमीकेबाबत जेव्हा एक वरिष्ठ नेते विपरीत वक्तव्य करतात तेव्हा धक्का बसतो, असं ते म्हणाले.

शरद पवार यांनी रविवारी इस्राइल-पॅलेस्टाईन संघर्षावर भाष्य केलं होतं. भारत कायम पॅलेस्टाईनच्या सोबत उभा राहिला आहे, असं ते म्हणाले होते. यावरुन भाजप नेत्याने त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं की, सर्व प्रकारच्या दहशतवादाचा आपण निषेध केला पाहिजे. संरक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीने अशाप्रकारचे वक्तव्य करणे दुर्दैवी आहे.

बाटला हाऊस एनकॉऊंन्टरवेळी अश्रू ढाळणाऱ्या सरकारमध्ये शरद पवार होते आणि जेव्हा भारताच्या भूमीवर हल्ला झाला तेव्हा हे लोक झोपले होते. अशा प्रकारची कुजलेली मानसिकता थांबवायला हवी. मला अपेक्षा आहे आता तरी पवार जी, देशाला प्रथम प्राधान्य देतील, असं म्हणत त्यांनी हल्लाबोल केला.

शरद पवार नेमकं काय म्हणाले होते?

मुंबईत कार्यकर्त्यांच्या बैठकीत शरद पवार म्हणाले होते की, 'भारतीय पंतप्रधान कायम पॅलेस्टाईनच्या बाजूने उभे राहिले आहेत. हे दुर्दैवी आहे की पहिल्यांदा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्राइलसोबत आहेत. मोदींनी मूळ मुद्द्याला बगल दिली आहे. आपण आपल्या भूमिकेबाबत स्पष्ट असलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. ज्यांची मूळ भूमी आहे, त्यांच्याबाजूने आम्ही आहोत.'

हमासच्या अतिरेक्यांनी ७ ऑक्टोंबरला इस्राइलवर हल्ला केला होता. त्यानंतर भारताच्या पंतप्रधानांनी इस्राइलला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर शरद पवारांचे वक्तव्य आले होते. यावरुन त्यांच्यावर टीका होतेय. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: सोनं झालं 5,000 रुपयांनी स्वस्त; अवघ्या 15 दिवसांत सोन्याच्या भावात मोठी घसरण, आज काय आहे भाव?

Dehradun Accident: देहराडूनमध्ये भीषण अपघात, सहा तरुणांचा मृत्यू; काय आहे इनसाईड स्टोरी? पोलिसांकडे अद्याप तक्रार नाही

IND vs AUS: विराट कोहली जखमी? काल अचानक स्टार फलंदाज ऑस्ट्रेलियातील हॉस्पिटलमध्ये गेला अन्...

Latest Maharashtra News Updates : 'कटेंगे तो बटेंगे' हा देशाचा इतिहास- देवेंद्र फडणवीस

Sanjay Raut : भाजप एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीच काय विरोधी पक्ष नेता पण करणार नाही , संजय राऊत यांचा खोचक टोला

SCROLL FOR NEXT