देश

कोरोनासाठी अनोखा ‘इलेक्ट्रिक मास्क’; शुद्ध हवेसाठी उपयुक्त

विनायक होगाडे

यादद्री भुवनगिरी (तेलंगणा): कोरोनाच्या रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर आणि कॉन्सेंट्रेटर मिळविण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागत आहे. नेमके हेच लक्षात घेऊन रुग्णांना सहजपणे प्राणवायू मिळावा म्हणून तेलंगणमधील यादद्री भुवनगिरी जिल्ह्यामधील एका २४ वर्षीय युवकाने अनोखा इलेक्ट्रिक मास्क (electric mask) तयार केला आहे. हा मास्क घरातच पोर्टेबल नेब्युलायझर म्हणून काम करू शकतो. (Unique electric mask for corona patients Claims to be useful for pure air)

कुचंल शिवा नागराजू असे या युवकाचे नाव आहे. इंजिनिअर होण्याची इच्छा असलेल्या कुंचलला आर्थिक परिस्थितीअभावी बी.कॉम (संगणक) ची पदवी घ्यावी लागली. त्याने इतर मित्रांसोबत हा मास्क प्रत्यक्षात उतरविला. सोशल मीडियाच्या माध्यमातून बी.टेक. करणारे विद्यार्थीही यात सहभागी झाले. हा मास्क किंवा नेब्युलायझर हवा फिल्टर करून ती शुद्ध करतो. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णाला शुद्ध हवा मिळू शकते.

तो म्हणाला, की या नेब्युलायझरमध्ये प्रवेश करणारी हवेच्या चेंबरमध्ये जाते. तिथे शुद्ध झाल्यानंतर ती औषधांच्या चेंबरमध्ये प्रवेश करते. त्यानंतर, आणखी एकदा शुद्ध झाल्यानंतर मास्कला जोडलेल्या एका छोट्या पाईपमधून ती रुग्णाला मिळते. त्यामुळे, रुग्ण दोनदा शुद्ध केलेली हवा श्वसनावाटे घेऊ शकतो. या इलेक्ट्रिक मास्कमध्ये नेहमीच्या कापडी मास्कचाही वापर करण्यात आला आहे. मास्कमधील हवेच्या पातळ पाईपसोबत हा कापडी मास्क बसविला आहे. मास्कला छोटे प्रवेशद्वार असून त्याला नेब्युलायझरचा पाईप जोडला आहे. हा नेब्युलायझर एका छोट्या लाकडी पेटीत बसविण्यात आला असून तो सहजपण हाताळता येतो. या पोर्टेबल नेब्युलायझर इलेक्ट्रिक मास्कची किंमत ६०० ते ७०० रुपये इतकी आहे.

१२८ वेळा प्रयत्न

कुंचल आणि त्याच्या मित्रांनी इलेक्ट्रिक मास्क बनविण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न करावे लागले. अखेर त्यांना १२८ व्या प्रयत्नात यश आले. त्याचप्रमाणे, ३८ हजार रुपयेही खर्च करावे लागले. बाजारातील इतर मास्कपेक्षा हा इलेक्ट्रिक मास्क अधिक चांगला असल्याचा नागराजूचा दावा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT