Unique Marriage esakal
देश

Unique Marriage : तीस वर्षांपूर्वी मृत झालेल्या मुलीसाठी वर संशोधन करतंय कुटुंब; वरासाठी दिली जाहिरात!

या कुटुंबाने मृत मुलीच्या लग्नाचा घाट का घातलाय?

सकाळ डिजिटल टीम

Unique Marriage :

तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये भूताचे लग्न लावतात. किंवा दोन प्रेमी भूतांना हिरो एकत्र आणतो अशा गोष्टी पाहिल्या असतील. पण या खऱ्या आयुष्यात करण्याचा विचार कोणी करू शकत नाही. पण भारतातल्या एका कुटुंबाने चक्क आपल्या निधन झालेल्या मुलीसाठी वर संशोधन सुरू केले आहे.

होय तुम्ही खरं ऐकलंत, दक्षिण कन्नड जिल्ह्यात ३० वर्षांपूर्वी मरण पावलेल्या मुलीसाठी वर शोधणारी अलीकडची वृत्तपत्रातील जाहिरात चर्चेचा विषय बनली आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तूर येथील एका कुटुंबाकडून त्यांच्या मृत मुलीच्या लग्नाची तयारी सुरू केली आहे.

तीस वर्षांपूर्वी तुलुमधील कुटुंबातील लहान मुलीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या घरावर अनेक संकटे आली होती. एक प्रकारे मृत्यू झालेल्या मुलीच्या इच्छा अपूर्ण आहेत त्यामुळे असा त्रास कुटुंबाला होतोय, असे जाणत्या लोकांनी सांगितले. त्यावर तोडगा म्हणून मृत मुलीचे लग्न एका ३० वर्षांपूर्वी मरण पावलेल्या मुलाशी लावण्याचे या कुटुंबाने ठरवले आहे.

काय आहे जाहिरात

जाहिरातीमध्ये असे लिहिले आहे की, "३० वर्षांपूर्वी निधन झालेला वराचा शोध आम्ही घेत आहोत. तशी माहिती असल्यास आम्हाला कळवा, अशा आशयाची ही जाहीरात आहे. केवळ जाहीरात नाहीतर पाहुणेमंडळींमध्येही नाते जोडून कोणी मृत वर सापडतो का हे पाहिले जात आहे.

लग्नाचा घाट का घातलाय?

भारतात अनेक संकटांवर अनेक उपाय आहेत. त्यापैकी पितृदोषावर पितरांवर खूश करणे, त्यांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करणे हेही महत्त्वाचे मानले जाते. संबंधित कुटुंबावरही मुलीच्या मृत्यूनंतर अनेक संकटे आली आहेत. त्यामुळे, तिच्या नाराजीतून, दोषातून मुक्त होण्यासाठी पंडीतांनीच हा उपाय सांगितला आहे.

मृत व्यक्तीच्या लग्नाची ही प्रथा, तुलुनाडूमधील प्रथा दर्शवते.  कर्नाटकातील तीन किनारी जिल्ह्यांमध्ये पसरलेला प्रदेश आणि केरळच्या शेजारील कासारगोड जिल्ह्याचा एक भाग जेथे स्थानिक बोलीभाषा तुलु बोलली जाते. या भागात मृत व्यक्तीच्या विवाहाला महत्त्व आहे.

तुलुवा समाजातील मान्यतांनुसार, मृत लोक त्यांच्या कुटुंबाशी जोडलेले असतात.ते  त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होतात. परिणामी, 'वैकुंठ समर्धने' आणि 'पिंडप्रदान' यांसारखे विधी मृत आत्म्यांसाठी अन्नदान आणि विवाह आयोजित केले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT