unparliamentary words row no word is banned it is expunged clarifies lok sabha speaker om birla  
देश

Unparliamentary Words : कोणत्याही शब्दावर बंदी नाही, पण..., ओम बिर्लांचं स्पष्टीकरण

सकाळ डिजिटल टीम

Unparliamentary Words Controversy: देशाच्या संसदेच्या दोन्ही सभागृहात शब्दांच्या वापराबाबत जारी करण्यात आलेल्या यादीवरून नवा वाद पेटला आहे. लोकसभा सचिवालयाने शब्दांची एक लांबलचक यादी जारी केली आहे, जी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात असंसदीय मानली जाईल. दरम्यान, लोकसभा अध्यक्ष (Lok Sabha Speaker) ओम बिर्ला यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी १९५९ पासून सुरू असलेली ही लोकसभेची प्रक्रिया असल्याचे ते म्हणाले आहेत.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, त्या प्रक्रियेत जेव्हा जेव्हा एखादा सदस्य संसदेत चर्चेदरम्यान एखादा शब्द वापरतो तेव्हा पीठासीन अधिकारी तो शब्द असंसदीय घोषित करतात. आम्ही ते संकलित करतो. यापूर्वी त्याचे पुस्तक काढले जात होते, परंतु यावेळी कागदाचा वापर कमी करण्यासाठी ते ऑनलाइन काढण्यात आले आहे.

कोणत्याही शब्दावर बंदी नाही..

लोकसभा अध्यक्ष पुढे म्हणाले की, कोणत्याही शब्दावर बंदी घालण्यात आलेली नाही हे नमूद करणे महत्त्वाचे आहे. १९५४, १९८६, १९९२, १९९९, २००४, २००९ या वर्षातही अशा शब्दांचे संकलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हे संकलन २०१० नंतर दरवर्षी येऊ लागले आहे. बिर्ला पुढे म्हणाले की, सदस्य त्यांचे मत मांडण्यास मोकळे आहेत; तो अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, पण संसदेच्या शिष्टाचारानुसार तो अधिकार असावा, असे ते म्हणाले. .कोणत्याही शब्दांवर बंदी घालण्यात आलेली नाही, ज्या शब्दांवर यापूर्वी आक्षेप घेण्यात आले होते ते काढून टाकले आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

लोकसभा सचिवालयाने जारी केली यादी

लोकसभा सचिवालयाने असंसदीय शब्द (Unparliamentary Words) 2021 या शीर्षकाखाली अशा शब्द आणि वाक्यांची यादी जारी केली आहे, ज्यांना लोकसभा आणि राज्यसभेसह राज्य विधानमंडळांमध्ये असंसदीय घोषित करण्यात आले होते. या यादीत समाविष्ट शब्दांना 'असंसदीय अभिव्यक्ती' म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. या अंतर्गत दोन्ही सभागृहात चर्चेदरम्यान जुमलाजीवी, कोरोना स्पेडर, जयचंद, शकुनी, जयचंद, लॉलीपॉप, चांडाल चौकडी, गुल खिलाये, पिट्टू असे शब्द वापरता येणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT