मोदीजींचा संदेश घेऊन पुन्हा 300 पारचा नारा देत विजयाची गाथा लिहायचा आमचा प्रयत्न असणार आहे.
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीपूर्वी (Uttar Pradesh Assembly election) भाजपकडून (BJP) जोरदार प्रचार सुरुय, तर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी देखील प्रचारात मुसंडी मारलीय. आगामी निवडणुकीत सपा-बसपाचा भाजप सुपडासाफ करणार असून निवडणुकीत काँग्रेसला आम्ही खातंही उघडू देणार नाही. उत्तर प्रदेशात जेव्हा सपा (SP), बसपची (BSP) सरकार झाली, तेव्हा त्यांनी फक्त आपल्या जातीतील लोकांसाठीच काम केलं, असा गंभीर आरोप केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा (Amit Shah) यांनी आज 'सरकार बनाओ, अधिकार पाओ' रॅलीत बोलताना केला.
लखनौमध्ये (Lucknow) निषाद समाजाच्या रॅलीला (Nishad Samaj Rally) संबोधित करताना अमित शहा पुढे म्हणाले, एकीकडं अयोध्येत भगवान श्रीरामाचं मंदिर उभारलं जाणार आहे, तर दुसरीकडं काशीत विश्वनाथ धाम बांधलं जाणार आहे. ही गोष्ट हिंदूंसाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. आगामी निवडणुकीत सपा-बसपाचा सुपडासाफ होईल, तर काँग्रेसचं (Congress) खातं उघडणार नाही, असं आम्ही काम करणार आहोत. मोदीजी (Narendra Modi) आणि योगीजींचा (Yogi Adityanath) संदेश घेऊन पुन्हा 300 पारचा नारा देत विजयाची गाथा लिहायचा आमचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावं.
भाजप आणि निषाद पक्षाच्या संयुक्त रॅलीला संबोधित करताना शहा म्हणाले, 2019 च्या निवडणुकीत भाई संजय निषाद भाजपमध्ये दाखल झाले आणि निषाद समाज गावोगावी पोहोचला. ज्या राज्यात माफिया आणि गुंडांचं राज्य आहे, त्या राज्यात गरिबांचा कधीच विकास होत नाही. जिथं कायद्याचं राज्य आहे, तिथंच गरिबांचा विकास होत असतो, असं सांगत त्यांनी योगींच्या कामाचं कौतुक केलं. योगीजींच्या राज्यातील सर्व माफिया आता पळून गेले आहेत, असंही ते म्हणाले. मला जनतेला विचारायचं आहे. या सपा, बसपा, काँग्रेसनं देशावर आणि राज्यात अनेक वर्षे राज्य केलं, मग इतकी वर्ष तुम्हाला काय दिलं? गरिबांचं जीवनमान उंचावण्यासाठी मोदीजींच्या सरकारनं गॅस, शौचालय, घर, आरोग्य विमा अशा अनेक सुविधा दिल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.