लखनऊ: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिममीन (AIMIM) पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी सरतेशेवटी समाजवादी पक्षासोबतच्या (Samajwadi Party) युतीबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटलंय की, आम्ही काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष सोडून इतर कुणाहीसोबत युती करण्यास तयार आहोत. सामान्यत: लोक असे म्हणतात की, ओवैसी युती करण्यास तयार नसतात. आम्हाला तर युती हवीये. मात्र, प्रेम कधीच एकतर्फी असत नाही. (UP Assembly Election 2022)
ओवैसी यांनी पुढे म्हटलंय की, कुणासोबत युती करायची याची चर्चा टीव्ही कॅमेऱ्यावर होत नUP Election 2022सते. अखिलेश यादव यांनी आमच्यावर नको नको ते आरोप केलेत. मात्र, तरीही आम्ही म्हणतोय, की असुदे, ठिक आहे. भारतातील मुस्लिमांवर आरोप करणं ही सर्वसामान्य गोष्ट बनली आहे. आरोप नेहमी आमच्यावरच होतात. अखिलेश-मुलायम यांच्यावर कसे होतील? म्हणून आझम खान म्हैस, बकरी आणि पुस्तकांच्या चोरीच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत.
अखिलेश फक्त 'यादववाद'ला प्रोत्साहन देतात
ओवैसी यांनी अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलंय की, जिन्नांचा उल्लेख करत या निवडणुकीत अखिलेश यादव यांनी भाजपला मुस्लिमांविरोधात आणखी द्वेष पसरवायला एकप्रकारे मुद्दाच दिला आहे. वास्तव असं आहे की, अखिलेश यादव MY कॉम्बिनेशनची (मुस्लिम-यादव) गोष्ट तर करतात, मात्र सत्ता मिळताच मुस्लिमांना विसरुन जातात. यांच्याच काळात मुज्जफरनगरचे कांड घडले होते. हे लोक फक्त यादववादला पाठिंबा आणि प्रोत्साहन देतात.
६० वर्षांपासून आमच्यावर दहशतवादाचा ठपका
ओवैसी यांनी पुढे म्हटलंय की, साठ वर्षे आमच्यावर दहशतवादाचा आरोप लागला आहे. खरं तर अखिलेश यांच्याकडून आम्हाला प्रमाणपत्राची गरज नाहीये. ११ टक्के तुम्ही यादव आहात, १९ टक्के आम्ही मुस्लिम आहोत. तुम्ही जर मुख्यमंत्री बनला असाल तर ते मुस्लिमांच्या मतांनीच बनला होतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.