उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ २०२२मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी सत्तेत परतण्याचा दावा करत आहेत. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी 400 जागा जिंकल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती देखील सोशल इंजिनीअरिंगच्या मदतीने सत्तेत परतण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी या देखील कामाला लागल्याचे दिसते आहे.
उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभुमीवर सीवोटरने सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणातून उत्तर प्रदेशचे लोक मुख्यमंत्री म्हणुन कोणाला पसंती देणार हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री म्हणुन कुणाला किती पसंती?
योगी आदित्यनाथ - ४१ टक्के
अखिलेश यादव - ३१ टक्के
मायावती - १७ टक्के
प्रियंका गांधी - ४ टक्के
जयंत चौधरी - २ टक्के
इतर - ५ टक्के
सर्वेक्षणानुसार, यूपीमधील ४१ टक्के लोकांना योगी आदित्यनाथ यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे. दुसरीकडे, सपा प्रमुख अखिलेश यादव यांना ३१ टक्के पेक्षा जास्त लोक मुख्यमंत्र्याचा चेहरा म्हणून पाहतात. तर १७ टक्के लोक बसपाच्या अध्यक्ष मायावतींसोबत उभे असल्याचे दिसत आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि आरएलडी नेते जयंत चौधरी या शर्यतीत खूप मागे दिसत आहेत.
कोणत्या पक्षाला किती टक्के पसंती?
भाजप : ४१%
एसपी : ३२%
बसपा : १५%
काँग्रेस : ६%
इतर : ६%
सर्वेक्षणात हे स्पष्टपणे दिसत आहे की, उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजप सत्तेवर परतू शकते. मात्र, २०१७च्या तुलनेत भाजपला कमी जागा मिळू शकतात. तरीही आकडेवारीनुसार, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत बहूमताने भारतीय जनता पक्ष उत्तर प्रदेशात आपली सत्ता स्थापन करु शकेल.
कोणत्या पक्षाचे किती आमदार?
भाजप : २४१-२४९
एसपी : १३०-१३८
बसपा : १५-१९
काँग्रेस : ३-७
इतर : 0-4
C VOTER ने abp न्यूजसाठी पाच निवडणूक राज्यांचा मूड जाणून घेतला आहे. या सर्वेक्षणात 98 हजारांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला आहे. हे सर्वेक्षण ४ सप्टेंबर २०२१ ते ४ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.