मौलाना कलीम सिद्दीकी यांच्या हालचाली संशयास्पद असल्याचं म्हटलं जात होतं. बॉलिवूड अभिनेत्री सना खान हिचं लग्नसुद्धा मौलाना कलीम सिद्दीकी यांनी लावून दिलं होतं.
मौलाना कलिम सिद्दीकी याला एटीएसने धर्मांतरण प्रकरणी मेरठमधून केली आहे. त्यानंतर पत्रकारपरिषदेत पोलिसांनी याची माहिती दिली. उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितलं की, या प्रकरणाची चौकशी कऱण्यासाठी सहा टीम तयार करण्यात आल्या आहेत. तपासात अशी माहिती समोर आली की, मौलाना कलीम सिद्दीकी यांच्या ट्रस्टला परदेशातून ३ कोटी रुपये मिळाले आहेत. यामध्ये दीड कोटी रुपये बहरीनमधून आले असल्याचंही पोलिसांनी म्हटलं.
मौलाना सिद्दीकीला मुझफ्फरनगरमधून अटक केली. भारतातील सर्वात मोठ्या धर्मांतर प्रकरणात त्यांना अटक करण्यात आले. ते जामिया इमाम वलिलुल्लाह ट्रस्ट चालवत होते. या ट्रस्टच्या माध्यमातून मदरशांना आर्थिक रसद पुरवली जात होते. तर ट्रस्टला परदेशातून पैसे मिळत होते अशी माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली.
मंगळवारी मौलाना कलीम सिद्दीकी यांच्यासह त्यांचे सहकारी मेरठमधील एका मशिदीत कार्यक्रमासाठी आले होते. रात्री नऊ वाजता ते पुन्हा घरी परतत असताना एटीएसने त्यांना ताब्यात घेतलं होत. मौलाना कलीम सिद्दीकी यांच्या हालचाली संशयास्पद असल्याचं म्हटलं जात होतं. बॉलिवूड अभिनेत्री सना खान हिचं लग्नसुद्धा मौलाना कलीम सिद्दीकी यांनी लावून दिलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.