encounter 
देश

UP Crime: अमेठी हत्या प्रकरणातील आरोपी एनकाऊंटरमध्ये गंभीर जखमी; पोलिसांची बंदूक हिसकावून पळत होता

कार्तिक पुजारी

UP Crime News: मुलांसह चार लोकांची हत्या करणारा आरोपी एनकाऊंटर दरम्यान जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पोलिसांची बंदुक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी पोलिसांनी गोळ्या चालवल्या. यात आरोपी चंदन वर्मा याच्या पायाला गोळी लागली आहे. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 'आज तक'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

चौकशीनंतर पोलीस आरोपी चंदन वर्माला एका ठिकाणी घेऊन जात होते. यावेळी आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला असं सांगितलं होतं. आरोपीने पोलिसांची बंदुक हिसकावली होती. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ हालचाल करत आरोपीच्या पायावर गोळी चालवली. मोहनगंज पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी आरोपी चंदन वर्माला नोएडातील एका टोल नाक्यावरून काल अटक केली होती.

काय आहे प्रकरण?

अमेठीधमध्ये दलित कुटुंबातील चार लोकांची घरात घुसून हत्या करण्यात आली होती. ३ ऑक्टोबरला शिक्षक आणि त्याच्या कुटुंबातील चार जणांची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणामुळे लोकांमध्ये संतापाची भावना आहे. आरोपीचा एनकाऊंटर करण्यात यावा अशी मागणी लोक करत आहेत.

शिक्षक सुनील कुमार, त्यांची पत्नी पुनम आणि दोन मुली यांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. सुनील हे रायबरेलीचे राहणारे आहेत. बदली झाल्यानंतर ते अमेठी येथे राहायला आले होते. याठिकाणी कुटुंबासोबत एका किरायाच्या घरात ते राहत होते. याच घरात हत्या झाली आहे. नातेवाईकांनी याप्रकरणी तात्काळ न्यायाची मागणी केली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, शिक्षकाची पत्नी आणि आरोपी यांचे प्रेमसंबंध होते. ते दोघे व्हिडिओ कॉलवरून एकमेकांना बोलायचे. पण, ही गोष्टी शिक्षक पतीला कळाली होती. त्यामुळे पुनमने आरोपीशी बोलणे बंद केले होते. याच रागातून त्याने ही हत्या केली असल्याचं बोललं जात आहे. आरोपीने हत्येआधी व्हॉट्सअप स्टेटस ठेवले होते. यात तो म्हणाला होता की, त्याच्या हातातून ५ लोक आज मरणार आहेत. कोणत्या पाचव्या व्यक्तीला तो मारणार होता हे कळू शकलेलं नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : शिवरायांच्या विचारातूनच संविधान निर्मिती.. राहुल गांधींनी केलं छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण, मोदींवर केली जोरदार टीका

Latest Marathi News Live Updates : माजी आमदार सिताराम घनदाट घेणार शरद पवारांची भेट

Team India semi-Final scenario: भारतीय संघ पहिलाच सामना हरला, उपांत्य फेरीचा मार्ग अवघड झाला; पाकिस्तानचा संघ पुढे गेला...

'ते' वक्तव्य भोवलं! काळे झेंडे दाखवत राहुल गांधींच्या कोल्हापूर दौऱ्याला भाजपचा तीव्र विरोध, पोलिस-कार्यकर्त्यांत झटापट

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’साठी भावांनी मागितली माफी,योजनेसाठी बनावट अर्ज केल्याने सहा जणांची चाैकशी

SCROLL FOR NEXT