daya shankar singh and swati singh 
देश

पत्नीचं तिकिट कापल्यानं खूश झालेल्या नेत्याला भाजपची उमेदवारी

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने त्यांच्या उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे.

उत्तर प्रदेश (UP Election 2021) विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने (BJP) त्यांच्या उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. यात ४५ नावे असून अमेठीतून राजा डॉक्टर संजय सिंह (Raja Dr Sanjay Singh) यांना उमेदवारी दिली गेली. तर दुसरीकडे योगींच्या मंत्रिमंडळातील मंत्री स्वाती सिंह (Swati Singh) यांना तिकिट नाकारलं मात्र, त्यांचे पती दयाशंकर सिंह (Daya Shankar Singh) यांना बलिया नगरमधून तिकिट दिलं आहे. याशिवाय भाजपने बलियातील बैरियात आमदार सुरेंद्र सिंह यांना डावलून आनंद स्वरुप शुक्ला यांना उमेदवारी दिली आहे.

दयाशंकर हे स्वत: आणि त्यांच्या पत्नी स्वाती सिंह दोघेही लखनऊत सरोजनी नगरमध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते. मात्र, पक्षाने दोघांच्या भांडणात तिसऱ्या व्यक्तीला म्हणजेच राजराजेश्वर सिंह यांना इथून उमेदवारी जाहीर केली. याआधीच्या यादीमध्ये त्यांचे नाव जाहीर केले गेले. त्यानंतर दयाशंकर यांनी तेव्हा पत्नीला तिकिट नाकारल्यानंतरही आनंद व्यक्त केला होता. तसंच राजराजेश्वर सिंह यांना पूर्ण पाठिंबा देऊ असंही म्हटलं होतं.

दयाशंकर सिंह यांनी तेव्हा प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, आता राजराजेश्वर सिंह यांना निवडून आणण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावेन. दोघेही बलिया गावचे असून दोघांचे कौटुंबिक संबंध आहेत. तसंच तिकिट देणं न देणं हा पक्षाचा निर्णय आहे. पक्षाने आमच्यासाठीसुद्धा काहीतर चांगलं ठरवलं असेल असंही ते म्हणाले होते. आता पक्षाने त्यांना बलिया नगरमधून उमेदवारी दिली आहे.

बलिया नगरमध्ये याआधी आमदार आनंद स्वरुप शुक्ला हे निवडून आले होते. त्यांचा पत्ता कट करून उत्तर प्रदेश भाजपचे दयाशंकर सिंह यांची वर्णी लागली आहे. दया शंकर सिंह हे मूळचे बक्सर बिहारचे आहेत. हा जिल्हा बलियाला लागून आहे. त्यांचे शिक्षण आणि राजकारणाची सुरुवातसुद्धा बलियातून झाली आहे. त्यामुळेच त्यांना बलियामधून तिकिट दिलं गेल्याचं म्हटलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Shweta Mahale Won Chikhli Assembly Election 2024: चिखली विधानसभेत काँग्रेस विरुद्धच्या थरारक सामन्यात भाजपच्या श्वेता महाले विजयी!

SCROLL FOR NEXT