उत्तर प्रदेश निवडणूक हिंदुत्त्वाच्या मुद्यावर लढवण्याची तयारी भाजपनं केलीय.
UP Election 2022 : उत्तर प्रदेश निवडणूक (Uttar Pradesh Assembly Election) हिंदुत्त्वाच्या मुद्यावर लढवण्याची तयारी भाजपनं (BJP) केलीय. भाजप अनेकदा भाषणांत श्रीराम (Shriram) आणि अयोध्येचं नाव घेते. मात्र, आता बसपानंही (BSP) अयोध्या आणि माता सीतेच्या नावावर नवं राजकारण सुरू केलंय. अयोध्येत राखीव जागा असलेल्या मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघातील (Milkipur Assembly Constituency) आपल्या निवडणूक रॅलीत बसपाचे सरचिटणीस सतीश मिश्रा (Satish Mishra) यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधत टीका केलीय.
मिश्रा म्हणाले, भाजपाचे लोक रामाच्या नावावर मतं मागत फिरतात. पण, माता सीतेला ते विसरताहेत. सगळ्यांनाच माहितीय, की माता सीतेशिवाय राम अपूर्ण आहे. त्यामुळं सीता (Sita) आधी आणि मगच राम आहे. तसेच राधेशिवाय कृष्ण नाही आणि पार्वतीशिवाय शिवशंकर नाही, त्यामुळं या तीन मातेंशिवाय भाजपला कोणत्याच प्रकारचं राजकारण करता येत नाही. यावरुनच स्पष्ट होतं की, भाजपची महिलांप्रती असलेली विकृती दिसून येतेय, असा घणाघातही त्यांनी केलीय.
सतीश मिश्रांनी समाजवादी पक्षावर (Samajwadi Party) उत्तर प्रदेशात 134 दंगली घडवून आणल्याचा आरोपही केलाय. भाजप आणि सपा हे दोघे मिळून या दंगली घडवताहेत, असंही ते म्हणाले. राज्यात योगींचं सरकार स्थापन झाल्यापासून यूपीत गुंडगिरी, माफिया, दहशत, खंडणी, बलात्कार, दंगली हे सर्वकाही वाढलंय, असंही त्यांनी सांगितलं. रॅलीदरम्यान मिश्रांनी अयोध्या मंडळातील 3 जागांसाठी उमेदवारांची घोषणा केलीय. यात सुलतानपूरच्या लंबुआ विधानसभेतून उद्धराज वर्मा पंकज, अमेठीतून (Amethi) रागिणी तिवारी आणि सुलतानपूर शहरातून डॉ. डीएस मिश्रा हे बसपाचे उमेदवार असणार आहेत. अयोध्या मंडलात 25 जागा असून त्यात 6 राखीव जागा आहेत आणि त्या सर्व जागा बसपा लढवणार असल्याचंही मिश्रांनी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.