लखनौ : समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (SP Chief Akhilesh Yadav) यांना व्हर्च्युअल रॅली घेणे चांगलेच महागात पडल्याचे दिसतेय. या रॅलीमध्ये कोरोना नियमाचे उल्लंघन (Covid Protocols) झाल्याने निवडणूक आयोगाने (Election Commission) पक्षाला नोटीस बजावली आहे. तसेच २४ तासांत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (UP Election 2022) काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. समाजवादी पक्षाने १४ जानेवारीला एक 'व्हर्च्युअल' रॅली आयोजित केली होती. त्यावेळी सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी जनतेला संबोधित केले. पण, रॅली जरी व्हर्च्युअल असली तरी लखनौ येथील पक्ष कार्यालयात शेकडो समर्थकांनी उपस्थिती दर्शवली होती. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना गर्दी जमवल्याने पक्षाला नोटीस बजावण्यात आली आहे. उपलब्ध असलेल्या माहितीनुसार पक्षाने कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसतेय, असं नोटीसमध्ये नमूद करण्यात आलंय. तसेच नोटीसला उत्तर देण्यासाठी आणि आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी २४ तासांचा अवधी देण्यात आला आहे. उत्तर दिले नाहीतर आयोग कारवाई करण्याची शक्यता आहे.
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोरोना नियमांचे पालन करून निवडणुका घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने यापूर्वीच दिले आहेत. तसेच प्रचार रॅलींवर देखील बंदी घालण्यास सांगितले होते. आता ही बंदी २२ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. असे असतानाही अनेक पक्ष गर्दी करताना दिसत आहेत.
लखनौ पोलिसांनी दाखल केला गुन्हा -
लखनौ पोलिसांनी रॅलीत सहभागी झालेल्या समाजवादी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. समाजवादी पक्षाच्या जवळपास 2,500 नेत्यांविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 188, 269, 270 आणि 341 अंतर्गत महामारी रोग कायद्याच्या संबंधित कलमांसह गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
समाजवादीची भूमिका -
दरम्यान, समाजवादी पक्षाच्या उत्तर प्रदेश युनिटचे प्रमुख नरेश उत्तम पटेल म्हणाले, "आमच्या पक्ष कार्यालयात हा एक व्हर्च्युअल कार्यक्रम होता. आम्ही कोणालाही बोलावले नाही, पण लोक आले. आम्ही कोव्हिड प्रोटोकॉलचे पालन करून काम करतोय.'' भाजपच्या मंत्र्यांच्या दारात आणि बाजारातही गर्दी होती. पण, भाजपला आमच्या पक्षात गर्दी होण्यापासून अडचण आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.