Dharmapala Singh 
देश

UP Minister News: उशीर होत असल्यानं मंत्र्यानं थेट रेल्वे प्लॅटफॉर्मवर चढवली कार; प्रवाशांमध्ये अफरातफरी

Amit Ujagare (अमित उजागरे)

लखनऊ : रेल्वे पकडण्यासाठी उशीर होत असल्यानं एका मंत्र्यानं थेट आपली कारच रेल्वे प्लॅटफॉर्मवर चढवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अचानक प्लॅटफॉर्मवर वेगान कार आल्यानं प्रवाशांमध्ये मोठी अफरातफरी निर्माण झाली. सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या जीवाला धोका निर्माण होईल, अशा प्रकारचं कृत्य या मंत्र्यानं केल्यानं संताप व्यक्त होत आहे. (UP Minister Dharmpal Singh was boarded car directly on railway platform due to getting late)

उत्तर प्रदेशचे पधुधन मंत्री धर्मपाल सिंह यांनी हा उद्योग केला आहे. या महाशयांना पंजाब मेल या रेल्वे गाडीनं लखनऊहून बरेलीला जायचं होतं. पण रेल्वे पकडण्यासाठी उशीर होत असल्यानं त्यांची फॉर्च्युनर कार अपंगांसाठीच्या रॅम्पवरुन थेट प्लॅटफॉर्मवर चढवण्यात आली. (Marathi Tajya Batmya)

जोपर्यंत ते हावडा-अमृतसर मेल या रेल्वेत बसून पुढे रवाना होत नाहीत तोपर्यंत त्यांची कार प्लॅटफॉर्मवरच होती. यावरुन समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ट्वीट करुन त्यांना खोचक टोला लगावला आहे. बरं झालं ते बुलडोझर घेऊन स्टेशनवर आले नाहीत असं त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशचे मंत्र्यांना हावडा-अमृतसर रेल्वेनं लखनऊला उतरुन पुढे बरेलीला जायचं होतं. ही गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर येते. त्यांना उशीर झाल्यानं गाडी सुटू नये म्हणून त्यांना गाडी सुटण्याआधी प्लॅटफॉर्मवर पोहोचवण्यासाठी त्यांची कार रेल्वे कोर्टाच्या समोरील अपंगांसाठी तयार करण्यात आलेल्या रॅम्पवरुन थेट प्लॅटफॉर्म क्रमांक १ पर्यंत एस्कलेटरपर्यंत नेण्यात आली. त्यांची गाडी तोपर्यंत प्लॅटफॉर्मवर थांबवण्यात आली जोपर्यंत ते पंजाब मेलमध्ये बसून रवाना होत नाहीत. (Latest Marathi News)

नियम काय आहेत?

रेल्वेच्या नियमांनुसार, केवळ पायी चालणाऱ्या प्रवाशांनाच रँम्पवरुन जाऊन एस्कलेटरपर्यंत जाता येतं. पण असं न करता थेट लक्झरी कार चालवत सर्व नियमांची मोडतोड करून त्यांना बेकायदा पद्धतीनं प्लॅटफॉर्मवर नेण्यात आल्यानं त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitesh Rane: अटक टाळण्यासाठी नितेश राणेंची हायकोर्टात धाव; काय आहे प्रकरण?

हरियाना, जम्मू-काश्मीरचा निकाल, सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूबाबत खळबळजनक खुलासा, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

Women's T20 World Cup: हरमनप्रीत कौर उद्याचा सामना मुकणार? स्मृती मानधनाचं मोठं विधान; नेट रन रेटचं गणितही सांगितले

Haryana Election Results: ''हरियानामध्ये इतिहास घडला, यापूर्वी असं कधीच झालेलं नाही'' मोदींनी सांगितलं ५० वर्षांपासूनचं समीकरण

Sports Bulletin 8th October 2024: विनेश फोगाटची हरियाना निवडणूकीत बाजी ते BCCI समोर पाकिस्तानची शरणागती

SCROLL FOR NEXT