UPI server down : युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सर्व्हर एका तासाहून अधिक काळ डाउन आहे, ज्यामुळे देशभरातील वापरकर्त्यांना ऑनलाईन पेमेंट करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत वापरकर्त्यांनी ट्विटरवर तक्रार केली आहे.
PhonePe, Google Pay आणि Paytm सारख्या प्रमुख UPI अॅप्सद्वारे व्यवहार करत असताना अडतणी येत असल्याची अनेक वापरकर्त्यांनी ट्विटरवर तक्रार केली आहे. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर वापरकर्त्यांना पेमेंट फेल झाल्याचे नोटिफिकेशन मिळत असल्याचे समोर आले आहे
UPI सर्व्हर डाउन होण्याची ही वर्षातील दुसरी वेळ आहे, काही दिवसांपूर्वी 9 जानेवारी रोजी वापरकर्त्यांना अशाच सर्व्हर डाऊनला समोरे जावे लागले होते. दरम्यान NPCI ने अद्याप या समस्येबाबत औपचारिक ट्विट किंवा विधान जारी केलेले नाही.
UPI, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ची रिअल-टाइम पेमेंट सिस्टमचा भारतातील किरकोळ व्यवहारांमध्ये वाट जवळपास 60 टक्के इतका आहे. पेमेंट सिस्टम मोठ्या प्रमाणात व्यवहार केले जातात. त्यापैकी बहुतांश कमी किंमतीचे व्यवहार असतात . 100 रुपयांपेक्षा कमी व्यवहार केले जाण्याचे प्रमाण UPI च्या एकूण व्यवहारांपैकी 75 टक्के इतके आहे.
फक्त मार्च महिन्यातच, UPI ने 9.60 लाख कोटी रुपयांचे 540 कोटी व्यवहार केले आहेत दरम्यान, NPCI कडून बँक आणि इन-हाउस सर्व्हरवरील भार कमी करण्यासाठी ऑफलाइन मोडमध्ये पेमेंट करता यावेत यासाठी त्यावर काम केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.