UPSC Commission  esakal
देश

UPSCचा निकाल जाहीर; शुभम कुमार देशात अव्वल; 761 जणांची नियुक्ती

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारतीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा 2020 चा निकाल जाहीर केला आहे. एकूण 761 उमेदवारांना या निकालामधून नियुक्ती देण्यात आली आहे.

शुभम कुमारने या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. शुभम कुमार हा आयआयटी बॉम्बेमधून बी टेक सिव्हील इंजिनिअर आहे. तर जागृती अवस्थी हिने मुलींमधून अव्वल क्रमांक पटकावला असून एकूण उमेदवारांमध्ये तिचे स्थान द्वितीय आहे. तीने MANIT भोपाळमधून बी टेक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे.

निकालानुसार, टॉप 25 उमेदवारांमध्ये 13 मुले आणि 12 मुलींचा समावेश आहे. शिफारस केलेल्या उमेदवारांमध्ये 25 व्यक्ती अपंगत्व असलेल्या (07 ऑर्थोपेडिकली अपंग, 04 दृष्टिहीन आव्हान, 10 श्रवणदोष आणि 04 अनेक अपंग) यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून विनायक कारभारी याला ३७ वा रँक मिळाला आहे.

या परीक्षेसाठी जानेवारी 2021 मध्ये लेखी आणि सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 मुलाखती झाल्या होत्या. यामधून

  • 263 जनरल

  • 86 ईडब्ल्यूएस

  • 229 ओबीसी

  • 122 एससी

  • 61 एसटी

असे एकूण 761 जण उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी

  • 180 आयएएस,

  • आयएफएस 36,

  • आयपीएस 200,

  • अ गटातील केंद्रीय प्रशासकीय सेवा 302,

  • ब गटातील प्रशासकीय सेवा 118

अशी निवड करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT