upsc history sakal
देश

भारताला सर्वोत्तम अधिकारी देणाऱ्या UPSC परीक्षेला ९६ वर्षांचा इतिहास आहे..

यूपीएससी २०२१ च्या परीक्षेत पहिल्या तिघांत मुलींनी बाजी मारलीये

सकाळ ऑनलाईन

नुकताच संघ लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीच्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झालाय. २०२१ च्या या परीक्षेत ६८५ जणांना यश मिळालंय, महत्वाचं म्हणजे यंदाच्या या परीक्षेत पहिल्या तिघांत मुलींनी बाजी मारलेली पाहायला मिळतेय, ज्यात श्रुती शर्मा हिने पहिला क्रमांक पटकावलाय. तर अंकिता अग्रवाल हिने दुसरा तर जमिनी सिंघल हिने तिसरा क्रमांक पटकावलाय.

खरं तर या २०२१ च्या या परीक्षेची प्रीलिम्स १० ऑक्टोबर २०२१ रोजी झाली होती. त्याचा निकाल २९ ऑक्टोबरला जाहीर झाला. मुख्य परीक्षा ७ ते १६ जानेवारी २०२२ या कालावधीत घेण्यात आली आणि निकाल १७ मार्च २०२२ रोजी घोषित करण्यात आला. यानंतर ५ एप्रिलपासून सुरू झालेल्या आणि २६ मे रोजी संपलेल्या मुलाखतींनंतर आज यूपीएससी परिक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे.

दरम्यान युपीएससी परीक्षेबद्दल सांगायचं झालं तर, यूपीएससी ही एक स्वतंत्र संस्था आहे. जी पूर्णपणे केंद्र सरकारच्या नियंत्रणात असते आणि कुठलही राज्य सरकारला यात हस्तक्षेप करण्यास अनुमती नसते. यूपीएससी अखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवा, आणि भारतीय संघाच्या सशस्त्र दलांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करते.

UPSC ही राष्ट्रीय स्तरावरील एक सिव्हिल सर्विस परीक्षा आहे ज्याद्वारे IAS, IPS, IRS अश्या एकूण २४ सेवांमध्ये भरती केली जाते. भारतात घेतल्या जाणाऱ्या सर्वात कठीण परिक्षांपैकी यूपीएससी एक आहे.

तर यूपीएससीची ही सुरुवात पार स्वातंत्र्याआधी म्हणजेच १८५४ साली झाली, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीद्वारे याची कल्पना सुचवली गेली होती. देश आणि सोबतच राज्याचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी त्याची स्थापना केली गेली. तसेच लोकांना त्यांच्या योग्यतेनुसार नोकरी मिळावी, या उद्देशाने सुद्धा या सिव्हिल सेवा परीक्षेची सुरुवात केली गेली.

सुरुवातीच्या काळात ही परीक्षा लंडनमध्ये आयोजित केली जायची. आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कारभार कसा चालायचा हा काही वेगळा सांगायला नको. म्हणजे व्हायचं काय या परीक्षेचा अभ्यासक्रम असा काही बनवला जायचा की फक्त ब्रिटिश उमेदवारचं पास होऊ शकत होते.

पण अशी ही अवस्था असताना सुद्धा १८६४ सत्येंद्रनाथ टागोर यूपीएससी मध्ये यशस्वी होणारे पहिले भारतीय व्यक्ती बनले. सत्येंद्रनाथ टागोर म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांचे भाऊ. दरम्यान काही वर्षांनी पहिले महायुद्ध सुरू झाले आणि मौन्टेंग्यू चेम्सफोर्ड यांच्या सुधारणेमुळे यूपीएससी परीक्षा भारतात आयोजित केली जाऊ लागली.

यातूनच १ ऑक्टोबर १९२६ रोजी भारतात केंद्रीय लोकसेवा आयोगची स्थापना करण्यात आली. त्या वेळेस सर रॉस बार्कर, होम सिव्हिल सर्विस, युनायटेड किंगडमच्या सदस्य आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. यांनतर २६ जानेवारी १९५० मध्ये भारताच्या संविधानाची सुरुवात झाली आणि यासोबतच केंद्रीय लोकसेवा आयोगाला देखील मान्यता मिळाली. आणि तेव्हापासून ते आज म्हणजे जवळपास ९६ वर्ष याच संस्थेव्दारे भारतातील सर्वोत्तम अधिकाऱ्यांची निवड केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT