URI Attack Sakal
देश

7 Years of URI Attack : 'ती' काळपहाट! उरी हल्ल्याची धगधगती सात वर्षे

दत्ता लवांडे

१८ सप्टेंबर २०१६. पहाटेची वेळ. काश्मिरातल्या उरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर पहाटेच्या गुलाबी थंडीत अचानक धडकी भरवणाऱ्या धाड् धाड् गोळ्यांचा आवाज आला आणि एकच गलका उडाला. जैश-ए-मोहम्मदच्या चार अतिरेक्यांनी भारतीय लष्कराच्या तळावर हल्ला केला होता. यामध्ये भारताचे १९ जवान मृत्यूमुखी पडले. भारतीय लष्करावर झालेल्या सर्वांत मोठ्या हल्ल्यांपैकी हा एक हल्ला. या घटनेला आज सात वर्षे पूर्ण झाली.

१८ सप्टेंबर २०१६ रोजी पहाटे ५.३० च्या सुमारास, चार दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेजवळ उरी येथे भारतीय लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला. कडक सुरक्षा पार करूनही दहशतवादी छावणीत घुसले आणि लष्करावर हल्ला केला. या हल्ल्यात अवघ्या ३ मिनीटांत १७ ग्रेनेड सोडण्यात आल्याची माहिती समोर आली. तर १७ जवान घटनास्थळी तर २ जवान उपचार सुरू असताना शहीद झाले. प्रतिहल्ल्यामध्ये चारही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. नंतर परिसरात सर्च ऑपरेशन सुरू राहिले.

या घटनेचे पडसाद भारतभरातच नाही तर जगभरात पडले. भारतीय संरक्षण मंत्री, गृहमंत्री, प्रधानमंत्र्यांनी यासंबंधित तातडीची बैठक घेऊन पाकिस्तानला लगेच प्रत्युत्तर न देता सुरक्षित पावले टाकली. पाकिस्तानची जागतिक पातळीवर राजकीय, आर्थिक, व्यापारी कोंडी करण्याचा भारताचा डाव यशस्वी ठरला आणि अवघ्या १० दिवसांतच या हल्ल्याला हल्ल्यानेच प्रत्तुत्तर दिले.

भारतीय लष्कराने पाकिस्तानचा भाग असलेल्या काश्मिरमध्ये दहशतवाद्यांनी वापरलेल्या लाँचपॅडवर सर्जिकल स्ट्राईक केले आणि पाकिस्तानला धडा शिकवला. तो दिवस होता २८ सप्टेंबर २०१६. उरी हल्ल्यानंतर फक्त १० दिवसांतच भारताने प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानाला धडा शिकवला होता. पण उरी हल्ल्याच्या भळभळत्या जखमा आजही प्रत्येक भारतीयांच्या मनात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: विधानसभा निवडणुका जिंकण्याचा एकनाथ शिंदेंचा हा आहे 'मास्टर प्लॅन'; ठाण्यात नाही तर 'या' ठिकाणी ठोकणार तळ

SA vs IND: मी फार विचार केला, तर इमोशनल होईन; १० वर्ष मी वाट पाहिली! Sanju Samson ने मैदानासोबत मनंही जिंकली

शेतकऱ्यांची होणार संपूर्ण कर्जमाफी! राज्यातील साडेपंधरा लाख शेतकरी थकबाकीत; कर्जमाफीसाठी लागणार 30,495 कोटी; जाणून घ्या, जिल्हानिहाय थकबाकीदार शेतकरी

Raju Patil: ...यांच्या नियत मध्ये खोटं आहे, त्याप्रमाणे घडलं; खासदार डॉ. शिंदेंनी मैत्री न निभावल्याने मनसे आमदार पाटील दुखावले

Sakal Podcast: ‘TET’ परीक्षेवर राहणार ‘AI’ची नजर ते रश्‍दींच्या ‘द सॅटनिक व्हर्सेस’ पुस्तकावरील बंदी उठवली

SCROLL FOR NEXT