पणजी: गोवा विधानसभा निवडणूक (Goa Assembly Elections) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातच गोवा भाजपमध्ये (Goa BJP) धुसफूस पाहायला मिळतेय. भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर (Late Manohar Parrikar) यांचा मुलगा उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) आणि भाजपचे गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यामध्ये पणजीच्या जागेवरुन कलगीतुरा पहायला मिळाला. पर्रिकर यांना पणजीची जागा न दिल्याने त्यांनी आता त्याच जागेवरुन अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिलेलं आहे.
कारण, शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी भाजप वगळून सर्व पक्षांना एक विनंती करत म्हटलं होतं की, गोवा विधानसभा निवडणुकीत उत्पन पर्रीकर जर स्वतंत्र्य लढत असतील तर त्यांना सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा. तसेच त्यांच्याविरोधात कोणीही उमेदवार देऊ नये. त्यांनी गोवा फॉरवर्ड पार्टी, आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस या तिन्ही पक्षांसमोर संजय राऊतांनी प्रस्ताव ठेवला आहे. हीच खरी पर्रीकरांना श्रद्धांजली असेल, असंही संजय राऊत म्हणाले होते.
या ठिकाणी शिवसेनेने शैलेंद्र सुभाष वेलिंगकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र राऊत यांनी म्हटलं होतं की, मी माझा उमेदवार सध्या जाहीर करतोय. पण, पर्रीकरांचा जर अपक्ष लढण्याचा निर्णय झाला तर ते उमेदवारी अर्ज दाखल करणार नाहीत. किंवा अर्ज दाखल केल्यावर पर्रीकरांचा निर्णय झाला तर अर्ज मागे घेऊ, असं त्यांनी म्हटलं होतं. उद्धव ठाकरेंसोबत बोलून हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. त्यानुसार आता सगळ्यांचंच शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिलेलं आहे.
या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की, स्व. मनोहरभाई हे मोठे नेते होते आणि आमच्यासाठी ते मोठेच राहतील. त्यांच्या कुटुंबातील कुणी राजकारणात येत असेल,तर त्याचा आनंदच आहे. स्वत: मनोहरभाई हे सुद्धा पक्ष संघटनेसाठी आधी बांधिल होते. त्यांच्यासाठी पक्षहित हीच सर्वोच्च प्राधान्याची बाब होती..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.