सध्या देशात ताजमहालच्या तळाघरात बंद असलेल्या 22 खोल्यांवरून वाद सुरुय.
सध्या देशात ताजमहालच्या (Taj Mahal Controversy) तळाघरात बंद असलेल्या 22 खोल्यांवरून वाद सुरुय. दरम्यान, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानं (Archaeological Survey of India, ASI) या खोल्यांचे फोटो आता प्रसिद्ध केले आहेत. आग्रा एएसआयचे प्रमुख (Agra ASI) आरके पटेल यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितलं की, 'एएसआय वेबसाइटवर जानेवारी 2022 चे न्यूजलेटर म्हणून फोटो उपलब्ध आहेत, हे फोटो पाहण्यासाठी कोणीही त्यांच्या वेबसाइटला भेट देऊ शकतो आणि ते फोटो पाहू शकतात.'
आरके पटेल म्हणाले, बंद खोल्यांच्या आतील दुरुस्तीच्या कामाचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्याच वेळी, पर्यटन उद्योगातील सूत्रांनी सांगितलं की, या खोल्यांमध्ये काय आहे याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरू नयेत म्हणून हे फोटो सार्वजनिक केले गेले आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या (Allahabad High Court) लखनौ खंडपीठानं अलीकडेच या 22 खोल्या उघडण्यासाठी डॉ. रजनीश कुमार यांनी दाखल केलेली जनहित याचिका फेटाळून लावली होती. यानंतर हे फोटो ASI ने शेअर केले आहेत.
या बंद खोल्यांमध्ये प्लास्टर, चुन्याचे पॅनिंगसह नूतनीकरणाचे काम करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. या कामासाठी सुमारे 6 लाख रुपये खर्च करण्यात आले. ताजमहालच्या 22 खोल्या उघडण्याच्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टानं म्हटलंय की, तुम्ही समितीमार्फत वस्तुस्थितीचा शोध घेण्याची मागणी करत आहात, तुम्ही कोण आहात? हा तुमचा अधिकार नाही आणि ते आरटीआयच्या कक्षेत येत नाही. त्यामुळं आम्ही तुमच्या युक्तिवादाशी सहमत नाही, असं नमूद केलंय. दरम्यान, अलाहाबाद उच्च न्यायालयानं पुढं म्हटलं होतं की, खोली उघडण्याच्या मागणीसाठी कोणत्याही ऐतिहासिक संशोधनाची गरज आहे, आम्ही रिट याचिका विचारात घेण्यास सक्षम नाही, ही याचिका फेटाळली जाते. तत्पूर्वी, सुनावणीदरम्यान हायकोर्टानं याचिकाकर्त्याला चांगलंच फटकारलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.