RSS on BJP : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपवर जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर चोहोबाजूंनी याच मुद्द्यावर चर्चा होत आहे. दोन्ही संघटना एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचं आजवर उघड गुपित होतं. परंतु आता संघाने भाजपवर थेट हल्ला केल्यामुळे पुढे काय होणार, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेणार आहेत. संघाच्या नेत्यांकडून होत असलेल्या विधानांच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जातेय. याशिवाय उत्तर प्रदेशमध्ये भाजपला आलेले अपयश आणि 'योगी हटाव' मोहिमेच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व आहे.
रा. स्व. संघाचे वरिष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी गुरुवारी भाजपवर टीका करत अहंकारी असल्याचं म्हटलं होतं. तसेच, विरोधी पक्षही 'रामविरोधी' असल्याची टीका त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना केली. इंद्रेश कुमार हे संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत. जयपूर येथे झालेल्या 'रामरथ अयोध्या यात्रा दर्शन पूजन समारंभात बोलताना इंद्रेश कुमार यांनी पक्षांवर नाव न घेता टीका केली होती.
त्यानतंर शुक्रवारी इंद्रेश कुमार यांनी वेगळं विधान केलं. त्यांनी भाजपचं कौतुक केलं. ज्यांनी रामाला विरोध केला ते सत्तेबाहेर फेकले गेले. पण, ज्यांनी रामाजी बाजू घेतली, त्यांचा संकल्प पूर्ण केला ते आता सत्तेमध्ये आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात तिसऱ्यांदा सरकार स्थापन झाले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात देशाची प्रगती होईल असा विश्वास प्रत्येकांमध्ये निर्माण झाला आहे. आमची इच्छा आहे की हा विश्वास वाढत राहो आणि त्याला गोड फळे यावेत, असं ते म्हणाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.