सध्या देशभरात हिंदू-मुस्लिम वाद उफाळला असून अनेक राज्यात दंगलीसारख्या घटना घडत आहेत.
सध्या देशभरात हिंदू-मुस्लिम वाद (Hindu-Muslim) उफाळला असून अनेक राज्यात दंगलीसारख्या घटना घडत आहेत. त्यातच आता उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये (Prayagraj in Uttar Pradesh) एका खासगी शाळेच्या मुख्याध्यापिकेविरोधात धार्मिक भावना भडकावल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. बुशरा मुस्तफा (Bushra Mustafa) असं या मुख्याध्यापिकेचं नाव असून तिनं शाळेतील एका कार्यक्रमाच्या निमित्तानं 20 सेकंदांसाठी मुस्लिमांची गोल टोपी घालून एक व्हिडिओ पोस्ट करण्याचं फरमान जारी केलं होतं. मुस्तफा यांच्या या निर्णयावर अनेकांनी आक्षेप घेतला होता.
दरम्यान, शाळा प्रशासनानं मुस्तफा यांचा बचाव केला होता. अशा प्रकारच्या अॅक्टिव्हिटी दिवाळी (Diwali), दसरा, प्रजासत्ताक दिन अथवा स्वातंत्र्य दिनी आयोजित केल्या जातात, असं शाळा प्रशासनानं म्हटलंय. मुस्तफा या झुंसी पोलीस ठाण्याच्या (Jhunsi Police Station) हद्दीत असलेल्या हवैलिया भागातील नयानगर शाळेच्या (Nayanagar School) मुख्याध्यापिका आहेत. या शाळेत जवळपास 1200 मुलं शिकत आहेत.
विश्व हिंदू परिषद (Vishwa Hindu Parishad) आणि गो रक्षा विभागाचे विभागीय पदाधिकारी लालमणी तिवारी यांनी मुस्तफा यांच्या या फरमानाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय. समाजात तेढ निर्माण करणं आणि लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा नोंदवण्यात आलाय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.