Mosque सकाळ डिजिटल टीम
देश

अयोध्येत मोठ्या दंगलीचा कट अयशस्वी; मशिदीबाहेर फेकल्या आक्षेपार्ह वस्तू

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेशातल्या(UttarPradesh) अयोध्या(Ayodhya) इथं मोठी दंगल होण्यापासून रोखण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी तीन मशिदींसह चार ठिकाणी आक्षेपार्ह पोस्टर्स, धार्मिक ग्रंथांच्या प्रती आणि डुकराचं मांस फेकण्याच्या आरोपाखाली सात लोकांना अटक केली आहे. या कृतीमागे शहरातलं वातावरण खराब करण्याचा उद्देश असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे - महेश कुमार मिश्रा, प्रत्युष श्रीवास्तव, नितिन कुमार, दीपक कुमार गौर उर्फ गुंजन, बृजेश पांडे, शत्रुघ्न प्रजापती, विमल पांडे. हे सर्व आरोपी अय़ोध्या जिल्ह्यातले रहिवासी आहेत. पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली असून चार आरोपी अद्याप फरार आहेत, पण त्यांना लवकरच अटक करण्यात येईल. अटक केलेल्यांची चौकशी केली असता समोर आलं आहे की, त्यांना शहरातलं वातावरण बिघडवायचं होतं.

सध्या शहरातली कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात असून शहरात कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शहरातल्या तीन मशिदींबाहेर आक्षेपार्ह वस्तू फेकण्यात आल्या होत्या. याशिवाय गुलाब शाह बाबा दर्ग्याच्या बाहेरही या वस्तू फेकण्यात आल्या होत्या.

जहांगीरपुरी हिंसाचाराचा(Jahangirpuri Violence) बदला घेण्यासाठी आपण हे कृत्य केलं असल्याचा जबाब आरोपींनी दिला आहे. आरोपी आपल्यासोबत कुराणाच्या प्रती आणि डुकराचं मांस घेऊन आले होते. ते या मशिदींबाहेर फेकून आरोपी फरार झाले. आरोपींवर कलम २९५ आणि २९५ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT